शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

धास्ती, तणाव अन् धावपळ....

By admin | Updated: November 10, 2016 00:42 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री देशातील चलनात असलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली.

५००, १००० च्या नोटा बंदचा फटका : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, नोटा घेण्यास व्यापाऱ्यांचीही नकारघंटाभंडारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री देशातील चलनात असलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली. त्याऐवजी २००० रुपयांची नोट चलनात आणत असल्याचे सांगितले. यामुळे देशात उमटलेले पडसाद जिल्ह्यातील नागरिकांमध्येही उमटल्या आहेत. अनेकांनी रात्री उशिरापर्यंत एटीएम केंद्रावर जाऊन नोटा बदलविण्याचा प्रयत्न किंवा खात्यामध्ये जमा करण्याचा प्रयत्न केला. आज सकाळपासून व्यापाऱ्यांनीही नोटा घेण्यासाठी नकार दर्शविल्यामुळे खरेदीदारांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. काळा पैसा जमा केलेल्या धनदांगड्यांसाठी पंतप्रधान मोदी यांनी हा प्रयोग केल्याची चर्चा आहे. दरम्यान काल अचानकपणे केंद्र सरकारने हा निर्णय घेऊन देशाच्या चलनातील ५०० व १००० रूपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. तशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ही बाब नागरिकांना माहित होताच, देशातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. याचा धसका भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनीही घेतला. अनेकांनी तर रात्रीलाच एटीएम केंद्रावर गर्दी करून घरी असलेल्या ५०० व १००० रूपयांच्या नोटा त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा प्रयत्न केला. यामुळे शहरातील अनेक एटीएम केंद्राबाहेर बोचऱ्या थंडीतही नागरिकांची मोठी गर्दी बघायला मिळाली. अनेकांच्या घरात मोठी रक्कम असल्याने मोदींच्या घोषणेनंतर त्यांची झोप उडाली आहे. आज अनेकांनी त्यांच्याकडील रक्कम बँकेत जमा करण्यासाठी बँकेकडे धाव घेतली. मात्र, बँकेंचा आर्थिक व्यवहार आज दिवसभर बंद होता. त्यामुळे अनेकांनी स्वत:जवळ आणलेली रक्कम परत नेली. नोटा चलनातून बंद करण्यात आल्याने अनेकांनी मागील अनेक दिवसांपासून घरात किंवा गुप्त ठिकाणी ठेवलेली रक्कम आज बाहेर काढली. आता या रक्कमेची कशी विल्हेवाट लावायची या विवंचनेत नागरिकांच्या चेहऱ्यावरील हास्य कोमेजले. (शहर प्रतिनिधी)एलआयसीनेही केले हात ‘वर’देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या भारतीय जीवन विमा निगमनेही आजच्या या परिस्थितीत त्यांच्या विमाधारकांना साथ दिली नाही. ‘जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी’ं म्हणणाऱ्या एलआयसीने अशी साथ न दिल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पसरली. एरव्ही ५०० व १००० रुपयांच्या नोटा बिनदिक्कत स्वीकारणाऱ्या भंडारा येथील एलआयसीच्या शाखेच्या प्रवेशद्वारावर ५०० व १००० रुपयांची नोट स्वीकारणार नसल्याची ाूचना नोटीस बोर्डवर लावण्यात आली होती. त्यामुळे अनेक जण विम्याचे हप्ते भरण्यासाठी आले असता त्यांना आल्यापावली परतावे लागले. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या एलआयसीने हातवर केल्याने ग्राहकांमध्ये असंतोष पसरला. चलनातून नोटा बंद झाल्याने आज दिवसभर धनादेशातून विमा रक्कम स्वीकारली. यामुळे एलआयसीच्या तिजोरीत आज ९० टक्के रोख रक्कम कमी झाली. बहुतांश व्यवहार हा रोखीने होत असल्याची माहिती शाखाप्रमुखाने ‘लोकमत’शी बोलताना दिली. सावकारही हिरमुसलेभंडारा जिल्ह्यात सावकारी करणारे अधिकृत परवानाधारकांची संख्या जितकी आहे, त्यापेक्षा अनेकपटीने अधिक प्रमाणात सावकारी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सावकारी करणाऱ्यांमध्ये व्यापाऱ्यांसह राजकीय पक्षांशी जुळलेल्या व्यक्तीही जुळलेल्या आहेत. भंडारा शहरात अशांची यादी मोठी असून अनेकांचे कोट्यवधी, तर अनेकांचे ५० लाखांहून अधिक रक्कम मार्केटमध्ये आहे. ५०० आणि १००० रूपयांच्या नोटांचे चलन बंद करण्याच्या घोषणेमुळे या सावकारांचे चेहरे चांगलेच हिरमुसले आहेत. ज्यांनी व्याजरूपाने कर्ज घेतले आहे, त्यांनी हे पैसे देण्यासाठी नकार दिला तर त्यांच्याविरूद्ध पोलीस तक्रारही करता येऊ शकत नाही. हा व्यवहार आपसी झाल्यामुळे पैसे परत मिळतील याची त्यांना शाश्वती नाही. त्यामुळे आपले कसे होईल, या चिंतेने सावकारांना ग्रासले आहे. बाजारपेठेत शुकशुकाटसध्या दिवाळीचे दिवस असल्याने कालपरवापर्यंत शहरातील बाजारपेठा ग्राहकांनी फुलून दिसत होत्या. मात्र मोदींच्या ‘सर्जीकल स्ट्राईक’मुळे नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. तर व्यापाऱ्यांनी ५०० व १००० रुपयांच्या नोटा घेण्यास विरोध केल्याने अनेक खरेदीदार आल्यापावली सामान ठेवून घराकडे परतले. याची माहिती सर्वत्र पसरताच भंडारा शहरातील बाजारपेठेत आज बुधवारला सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. यामुळे एकट्या भंडारा शहराचा विचार केल्यास व्यापाऱ्यांच्या गल्ल्यावर सुमारे ६० ते ७० टक्क्यांचा तोटा आला.