शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लोंबी आलेल्या धानाच्या बांधातील पाणी बाहेर काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2022 23:27 IST

जिल्ह्यात सिंचनाच्या सोयी नसल्याने १०० ते १२० दिवसांच्या कालावधीचे धानाची लागवड बऱ्याच प्रमाणात केले जात आहे. त्यामुळे मध्यम कालावधीच्या धानाचे निसवे झालेले आहेत. नियमित पावसामुळे बांधात पाणी साचलेले आहे. साचलेल्या पाण्यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे. पाणी काढल्यास धानाचा बुंदा मजबूत होतो. शक्यतो धान लोळत नाही. लोंबी आलेल्या धानाच्या बांधातील पाणी काढल्यास धान पिकावर कीड नियंत्रणासाठी मोठी मदत शक्य असल्याचे मत वर्तवले जात आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे. भंडारा जिल्ह्यात हलका व मध्यम धानाचा हंगाम आटोपतीला आहे. मात्र, पावसाचा व्यत्यय येत असल्याने ओल्या दुष्काळाची भीती आहे. सतत ढगाळ हवामानामुळे धान पिकावर विविध रोगराईचे सावट आहे. तुडतुडा जोर करीत आहे. शेतकरी बांधवांनी लोंबी आलेल्या धानाच्या बांधातील पाणी काढावे, असा सल्ला  कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.जिल्ह्यात सिंचनाच्या सोयी नसल्याने १०० ते १२० दिवसांच्या कालावधीचे धानाची लागवड बऱ्याच प्रमाणात केले जात आहे. त्यामुळे मध्यम कालावधीच्या धानाचे निसवे झालेले आहेत. नियमित पावसामुळे बांधात पाणी साचलेले आहे. साचलेल्या पाण्यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे. पाणी काढल्यास धानाचा बुंदा मजबूत होतो. शक्यतो धान लोळत नाही. लोंबी आलेल्या धानाच्या बांधातील पाणी काढल्यास धान पिकावर कीड नियंत्रणासाठी मोठी मदत शक्य असल्याचे मत वर्तवले जात आहे.ज्या शेतकऱ्याकडे भारी अर्थात १२० दिवसाच्या पुढचे धान आहेत त्यांच्याकडे स्वतंत्र सिंचन व्यवस्था असते. त्यामुळे त्यांनीसुद्धा पाणी बांधून ठेवू नये. पालांदूर व परिसरात काही शेतकऱ्यांच्या शेतात तुडतुड्याची लागण झालेली आहे. कीटकनाशक फवारून लाभ मिळत नसल्याचा सूर शेतकऱ्यांनी ऐकविला आहे. त्यावर कृषी तज्ज्ञांच्या मते, शून्य खर्चातील स्वतःच्या अधिकारातील उपाययोजना करीत तुडतुड्याकरिता प्रयत्न करावे. सिंचन सुविधेतील शेतकऱ्यांनी बांधातील पाणी प्रवाहित ठेवावे.

फवारणीसाठी वापरात येणारा पाणी स्वच्छ असावा. शक्यतो सायंकाळच्या वेळेस फवारणी करावी. शिफारसीनुसार कीडनाशकाची मात्रा व पाण्याचे प्रमाण नियोजित असावे. गरजेपेक्षा कमी-अधिक मात्रेत कीडनाशक फवारू नये. लोंबी आल्यानंतर महिनाभरात ओलाव्याने धान परिपक्व होतो. त्यामुळे बांधात पाण्याची मात्रा  ठेवू नये. नियमितपणे बांधात उतरून पिकाचे निरीक्षण करावे. फवारणी करण्यापूर्वी हवामान खात्याचा अंदाजसुद्धा लक्षात घ्यावा.-सुधीर धकाते, कृषीतज्ज्ञ, भंडारा.

 

टॅग्स :agricultureशेती