शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

‘डीपीसी’ ची अभ्यासिका दाखविते नोकरीची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 12:54 AM

महानगरातील महागडे कोचिंग क्लासेस म्हणजेच स्पर्धा परीक्षेत यश, असा सर्वसामान्यांचा समज. महानगरात जावून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र हमखाश यश मिळेलच याची खात्री नसते.

ठळक मुद्दे‘समाज कल्याण’ : २२ तरुण शासकीय सेवेत रुजू, बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा अभ्यासिका

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महानगरातील महागडे कोचिंग क्लासेस म्हणजेच स्पर्धा परीक्षेत यश, असा सर्वसामान्यांचा समज. महानगरात जावून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र हमखाश यश मिळेलच याची खात्री नसते. परंतु याला भंडारा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा अभ्यासिका याला अपवाद आहे. जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपुर्ण योजनेतून दोन वर्षांपुर्वी सुरु झालेल्या या अभ्यासिकेतून तब्बल २२ जण शासकीय सेवेत रुजू झाले आहेत.स्पर्धा परीक्षेबाबत आजही जिल्ह्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज आणि अनभिज्ञता आहे. केवळ महानगरातील क्लासेसमधूनच यश मिळते अशी त्यांची धारणा आहे. येथेही प्रज्ञावंत आणि हुशार विद्यार्थी आहेत. मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याचे निदर्शनास आले. त्यातूनच अभ्यासिका सुरु करण्याची संकल्पना शासकीयस्तरावर पुढे आली. जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला. येथील तुमसर मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून २६ जून २०१६ रोजी अभ्यासिका सुरु करण्यात आली. याठिकाणी प्रवेश परीक्षा घेवून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. मे किंवा जून महिन्यात चाळणी परीक्षा घेवून १५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. याठिकाणी एमपीएससी, युपीएससी, बँकीग आणि इतर स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी साधन सामुग्री उपलब्ध करुन दिली जाते.या मार्गदर्शन केंद्रामध्ये विविध विषयांची पुस्तके, मासिके, वृत्तपत्रे तर आहेच त्यासोबतच विद्यार्थ्यांना वायफायची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तीन संगणक एक लॅपटॉप, इंटरअ‍ॅक्टिव बोर्ड, प्रोजेक्टर, माईक, स्पिकर, झेरॉक्स मशीन, कोचिंग आदी सोयी उपलब्ध आहे.विशेष म्हणजे प्रत्येक महिन्या पहिल्या किंवा चवथ्या शनिवारी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले जाते. या अभ्यासिकेत चार हजारपेक्षा अधिक पुस्तके असून आॅनलाईन पध्दतीने परीक्षेची तयारी करवून घेतले जाते. यासाठी लोकप्रतिनिधीचे सहकार्य लाभत आहे. येथील ग्रंथपाल तृप्ती हाताग्रे सांगतात, याठिकाणी येणारा विद्यार्थी हा एक ध्येय घेवूनच प्रवेश करतो. मन लावून अभ्यास करतात. त्यांना आवश्यक असणाºया सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत येथे विद्यार्थी सतत अभ्यास करतात. एकत्र अभ्यास होत असल्याने समुह चर्चेतून विद्यार्थी आपल्या सोडवित असल्याचे त्यांनी सांगितले.यांना मिळाली नोकरीप्रदीप बळीराम बडोले (पीओ, सिंडीकेट बँक), सुधीर निळकंठ भांडे (पीओ, आयडीबीआय), प्रफुल्ल उत्तमराव डोंगरे (पीओ, युनियन बँक), सचिन गोपीचंद जमजार (महाराष्ट्र पोलीसदल), कल्याण चेटुले (आरोग्य विभाग), हिमांशु चांदेवार (स्टाफ सिलेक्सन कमीशन), नितेश उईके (कृषी विभाग), अक्षय हिवाळे (विमा कंपनी), सचिन धोटे (सीपीडब्ल्यूडी), चेतन चोपकर (बँक आॅफ बडोदा), हरिश बावनकुळे (बँक आॅफ महाराष्ट्र), अभिजित लोणसरे (बँक आॅफ बडोदा), गोपाल गुघाणे (एमपीएससी), अक्षय बिजवे (ईएसआयसी), संदिप ईश्वरकर (ओवरसिस बँक), कुमूद शेंडे (एमएसआरटीसी), प्रतीक शेंडे (डाक विभाग), हरिश राखाडे (डेपो मॅनेजर एसटी), रविंद्र धुर्वे (एनएसआरटीसी), मंजिरी भागवत (आयडीबीआय बँक) आणि राहुल काळे (एमपीएससी).पुण्या-मुंबईच्या विद्यार्थ्यांप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील तरुणही स्पर्धा परीक्षेत चमकावे त्यांचा टक्का वाढावा, या उद्देशाने ही अभ्यासिका सुरु करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या अभ्यासिकेत १५० विद्यार्थी सध्या अभ्यास करीत आहेत. भविष्यात विद्यार्थी संख्या वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न असतो.-आशा कवाडे, सहायक आयुक्त, समाज कल्याण भंडारा

टॅग्स :libraryवाचनालय