शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
4
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
5
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
6
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
7
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
8
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
9
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
10
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
12
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
13
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
14
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
15
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
16
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
17
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
18
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
19
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
20
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले

ट्रॅक्टरच्या शेत चिखलणी भाड्यात दुपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 05:00 IST

यंदाच्या खरीप हंगामात लाखांदूर तालुक्यात अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावली नाही. शेतात रोवणीयोग्य पाण्यासाठी शेतकºयांनी कृषी वीज पंपाद्वारे कालव्याचे पाणी घेऊन रोवणीला प्रारंभ केला आहे. शेतात रोवणी योग्य पाण्याची साठवण होताच शेतकऱ्यांनी चिखलणीसाठी ट्रॅक्टर मालकांकडे धाव घेऊन चिखलणीची कामे देखील सुरू केली आहे.

ठळक मुद्देइंधन दरवाढीचा फटका : शेतकऱ्यांवरील संकट संपता संपेना

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : धान उत्पादनात अग्रेसर समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील चौरास भागासह अन्य भागातही प्रामुख्याने ट्रॅक्टरद्वारे शेती हंगाम केला जातो. सध्या खरीपातील धान रोवणीला वेग आला असून सर्वत्र शेतात ट्रॅक्टरने चिखलणीचे काम सुरू आहे. मात्र ऐन हंगामातच शासनाने डिझेल-पेट्रोल इंधनाचे दरात अचानक वाढ केली. त्यामुळे ट्रॅक्टर धारकांनी चिखलणीच्या भाड्यात दुप्पटीने वाढ केली आहे. याचा जबर फटका शेतकऱ्यांना बसला असून शेतकऱ्यांचे अंदाजपत्रक बिघडले आहे.यंदाच्या खरीप हंगामात लाखांदूर तालुक्यात अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावली नाही. शेतात रोवणीयोग्य पाण्यासाठी शेतकºयांनी कृषी वीज पंपाद्वारे कालव्याचे पाणी घेऊन रोवणीला प्रारंभ केला आहे. शेतात रोवणी योग्य पाण्याची साठवण होताच शेतकऱ्यांनी चिखलणीसाठी ट्रॅक्टर मालकांकडे धाव घेऊन चिखलणीची कामे देखील सुरू केली आहे.सातत्याने पीक कर्ज घेऊन हंगामी शेती करणारा शेतकरी लॉकडाऊनमध्ये पुरता खचला असताना खरिपातील शेती हंगामात झालेली दरवाढ शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी ठरली आहे. दरम्यान शेती उत्पादन खर्चावर आधारित मूल्य उत्पादीत मालांना भेटत नसल्याने तसेही शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण नियमित होत असल्याचे दिसून येते.सध्याची दरवाढ हलाखीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना व मजुरांना असह्य वेदनादायी ठरल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी शासनाने तत्काळ दखल घेऊन ट्रॅक्टर चिखलणी भाड्यात दुप्पटीने झालेली दरवाढ कमी करण्यासाठी डिझेल-पेट्रोल इंधनाचे दर तात्काळ कमी करण्याची मागणी ट्रॅक्टर मालकांसह शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा शेतकऱ्यांचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांची बाजू समजून घ्यावी.दरवाढीने शेतकऱ्यांचे अंदाजपत्रक बिघडलेपंधरवड्यापूर्वी डिझेल पेट्रोलचे दर स्थिर असताना ट्रॅक्टर मालक चिखलणीचे प्रती एकर बाराशे ते पंधराशे रुपये ट्रॅक्टर भाडा घ्यायचे. मात्र डिझेल पेट्रोल इंधन दरवाढ झाल्याने ट्रॅक्टर मालकांनी सदरच्या भाड्यात दुपटीने वाढ करुन प्रति एकरी २८०० ते तीन हजार रुपये भाडा केल्याची माहिती अनेक शेतकऱ्यांनी दिली. सध्या डिझेलचे दर प्रति लिटर ७८ ते ८० रुपये आहे. प्रती एकर चिखलणीसाठी जवळपास २५ ते ३० लिटर डिझेल लागत असल्याने ट्रॅक्टर मालकानी ट्रॅक्टर चिखलणी भाड्यात केलेली दरवाढ योग्य असल्याचे एका ट्रॅक्टर मालकाने सांगतांनाच शासनाच्या इंधनाच्या दरवाढ विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती