शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

कोरोनाला घाबरू नका, काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 06:00 IST

कोरोना विषाणूला घाबरून न जाता त्याचे संक्रमणापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकांनी स्वच्छतेचा मार्ग आत्मसात करावा व स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी केले. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे वतीने जिल्हा परिषदेच्या आवारात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हात धुवा कार्यक्रम आयोजित केला होता, यावेळी त्या बोलत होत्या.

ठळक मुद्देभुवनेश्वरी एस : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हात धुवून दिला स्वच्छतेचा संदेश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना विषाणूला घाबरून न जाता त्याचे संक्रमणापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकांनी स्वच्छतेचा मार्ग आत्मसात करावा व स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी केले. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे वतीने जिल्हा परिषदेच्या आवारात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हात धुवा कार्यक्रम आयोजित केला होता, यावेळी त्या बोलत होत्या.हात धुवा प्रात्यक्षिकाच्या कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) राजेश बागडे, महिला व बालविकास अधिकारी मनिषा कुरसुंगे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एन. यादव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी योगेश जाधव, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एन. शर्मा, शिक्षणाधिकारी आर. एस. काटोलकर, उपजिल्हा कार्यकारी समन्वयक अधिकारी खोब्रागडे यांची उपस्थिती होती.यावेळी भुवनेश्वरी एस. म्हणाल्या, जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आलेला आहे. या आजाराला घाबरून न जाता, सावधानता बाळगण्याची गरज आहे. विषाणू रूग्णाच्या संपर्कात आल्यास या आजाराची शक्यता उदभवू शकते. कोरोना विषाणू संक्रमणापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकानी स्वत: उपाय योजना करून सावधानता बाळगावी. स्वच्छता पाळणे, नियमित हातधुणे, सॅनिटायझरचा वापर करणे या गोष्टीतून कोरोना विषाणूचा संसर्ग रोखून त्यावर मात करता येते. जिल्हा परिषदेमध्ये हातधूण्याचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यामागचा उद्देश अधिकारी कर्मचाºयांच्या माध्यमातून स्वच्छता संदेश सर्वदूर पोहचविण्यासाठी आहे, असे सांगितले.जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने साबून अथवा हॅण्डवॉशद्वारे हात धुवून कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखल्या जावू शकतो, याकरिता स्वच्छतेचे महत्व विषद करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या आवारात हातधूण्यासाठी विभाग प्रमुखांना पाचारण करण्यात आले. यावेळी विभाग प्रमुखांनी हात धुवून स्वच्छतेचा संदेश सर्वदूर पोहचविण्यात आला. यावेळी विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांनी स्वच्छतेकरिता नियमित हात धुवावे व आजाराचा प्रादूर्भाव रोखावी असे आवाहन केले. हातधुण्यासाठी जिल्हा कक्षाचे वतीने हॅण्डवॉश, सॅनिटायझर व नॅपकीनची व्यवस्था करण्यात आलेली होती.जिल्हा आरोग्य विभागाचे आवाहनजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात जनजागृती सुरू केली आहे. यासाठी फलेक्सच्या माध्यमातून खबरदारी घेण्याचे आवाहन करून उपाय योजना सांगितले आहेत.कोरोना विषाणूला घाबरू नका, सावध रहा, लक्षणे दिसल्यास उपचार घ्या असे आवाहन केले आहे. कोरोना विषाणू संसर्गाची खोकला, ताप, श्वासोच्छवासात अडळला निर्माण होणे आदी लक्षणे सांगून या विषाणूचा संक्रमण रोखण्यासाठी उपाय सांगितले आहेत. बाहेर देशातील कोरोना विषाणू बाधित क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांमध्ये जर लक्षणे आढळली तर त्वरित कॉल सेंटर अथवा आपल्या जवळील शासकीय रूग्णालयाशी संपर्क साधून उपचार करून घ्यावा. बाधित रूग्णांनी (प्रवासी) मास्कचा वापर करावा, इतर लोकांपासून दूर राहावे, घराबाहेर अधिक काळ वावरू नये, स्वत: उपचार करू नये, डॉक्टराच्या सल्लानुसार उपचार करावा. शिंकताना खोकताना रूमाल अथवा टिश्यू पेपरचा वापर करावा अशा प्रकारे काळजी घेण्याचे सांगितले आहे. तसेच कोरोना विषाणूचे लक्षणे आढळून आल्यास अशा व्यक्तीच्या विलगीकरणाची व्यवस्था जिल्हा सामान्य रूग्णालय भंडारा येथे करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषदेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हातधुवा कार्यक्रमाकरिता जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे तज्ज्ञ सल्लागार यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस