शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

रेती देता का.. रेती... नदी तीरावरील गावात ५० घरकुलांचे बांधकाम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 05:00 IST

 तामसवाडी (सिहोरा) येथे ५० घरकुल मंजूर आहे. काही घरकुलांचे बांधकाम सुरू असून स्लॅबपर्यंत काम आले आहे. परंतु लाभार्थ्यांना रेती मिळत नाही. गावापासून वैनगंगा नदीचा तीर हाकेच्या अंतरावर आहे. महसूल प्रशासनाने रेती चोरी होऊ नये, यासाठी महसूल कर्मचारी तैनात केले आहेत. नियमानुसार त्यांना नदी पात्रातून रेती घरकुल बांधकामाकरिता नेता येत नाही. त्यामुळे घरकुलांचे काम रखडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : गावापासून नदी हाकेच्या अंतरावर असूनही घरकुल लाभार्थ्यांना रेतीसाठी भटकंती करावी लागत आहे. सुमारे पन्नास घरकुलांचे काम महिनाभरापासून रखडले आहे. नियमानुसार रेती मिळण्यास लाभार्थ्यांना पंचायत समिती कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. त्यामुळे तुमसर तालुक्यातील तामसवाडी (सिहोरा) येथील लाभार्थ्यांना रेती देता का... रेती... असे म्हणण्याची वेळ आली आहे.  तामसवाडी (सिहोरा) येथे ५० घरकुल मंजूर आहे. काही घरकुलांचे बांधकाम सुरू असून स्लॅबपर्यंत काम आले आहे. परंतु लाभार्थ्यांना रेती मिळत नाही. गावापासून वैनगंगा नदीचा तीर हाकेच्या अंतरावर आहे. महसूल प्रशासनाने रेती चोरी होऊ नये, यासाठी महसूल कर्मचारी तैनात केले आहेत. नियमानुसार त्यांना नदी पात्रातून रेती घरकुल बांधकामाकरिता नेता येत नाही. त्यामुळे घरकुलांचे काम रखडले आहे. घरकुल लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीतून पत्र घेऊन ते पत्र गटविकास अधिकाऱ्यांना द्यायचे असून त्यानंतर ते पत्र तहसील कार्यालयात नेऊन देणे गरजेचे आहे. तहसील प्रशासनाने मंजुरी दिल्यानंतरच घरकुल लाभार्थ्यांना रेती नेण्याची मंजुरी मिळणार आहे. 

स्थानिक स्तरावरच रेती द्या- तामसवाडी रेती घाटातून अवैध रेतीचा प्रचंड उपसा होत होता. त्याकरिता महसूल प्रशासनाने या घाटातून रेतीची चोरी होऊ नये, याकरिता महसूल कर्मचारी नियुक्त केले आहेत. ही बाब कौतुकास्पद असली तरी स्थानिक घरकुल लाभार्थ्यांना मात्र येथे अनंत अडचणी येत आहेत. महसूल प्रशासनाने स्थानिक स्तरावर घरकुल लाभार्थ्यांना रेती देण्याची गरज आहे. स्थानिक प्रशासनाने येथे तत्काळ रेती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आहे.

 

टॅग्स :sandवाळू