शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रद्धेला खतपाणी घालू नका

By admin | Updated: June 17, 2016 00:44 IST

अंधश्रद्धेने ग्रासलेल्या, व्यसनाधीन, दारिद्र्यात खितपत पडलेल्या दु:खी मानवाचा उद्धार करावयाचा असेल तर या विज्ञान युगात भोंदू बाबा,

दिघोरे यांचे प्रतिपादन : चिचाळ येथे व्यसनमुक्ती कार्यक्रमचिचाळ : अंधश्रद्धेने ग्रासलेल्या, व्यसनाधीन, दारिद्र्यात खितपत पडलेल्या दु:खी मानवाचा उद्धार करावयाचा असेल तर या विज्ञान युगात भोंदू बाबा, साधू महंत महाराज यांचे चमत्कारावर विश्वास न ठेवता वर्षानुवर्षे पोखरून टाकणारी ही अंधश्रद्धेची व्याधी नष्ट करावयाची असेल तर महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या मानव धर्म शिकवणीचा प्रसार प्रचार करणे अत्यंत काळाची गरज आहे. असे प्रतिपादन परमात्मा एक सेवक मंडळ चिचाळ ज्येष्ठ मार्गदर्शक जयराम दिघोरे हे चिचाळ येथील व्यसनमुक्ती अभियान कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.परमात्मा एक सेवक मंडळ चिचाळच्या वतीने व्यसनमुक्ती अभियान कार्यक्रमाचे अध्यक्ष मार्गदर्शक जयराम दिघोरे प्रमुख अतिथी वासुदेव लेंडे, निमराज काटेखाये, धनराज दिघोरे, प्रकाश हातेल, भाऊदास पडोळे, भाऊराव लांजेवार, कुसुम दिघोरे, सुनिता हातेल, सुनंदा लोहकर, लता काटेखाये, परसराम दिघोरे, हुसन जिभकाटे, उद्धव जिभकाटे, गोमा लोहकर, गोविंदा तिभागेबार, महादेव जिभकाटे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक जयराम दिघोरे यांचे सर्व सेवकांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांना मार्गदर्शन करताना जयराम दिघोरे म्हणाले, बाबा जुमदेवजींनी एका भगवंताची प्राप्ती करून सन १९४९ ला मानवधर्माची स्थापना करून मानवाच्या जीवन सफल करण्यासाठी बाबानी चार तत्व, तीन शब्द व पाच नियम दिले. बाबा अंधश्रद्धेला विरोध करीत असत. बाबा कोणत्याही सेवकाकडून गुरुदक्षिणा घेत नसत व प्रत्येक आत्म्यात परमेश्वर असल्याने ते पाया पडून देत नव्हते. बाईला तर फार लांब उभे ठेवत असत. बाबा नेहमी सत्कर्म करीत असत व सेवकांनाही सत्कर्म करावयाच सांगत. भगवंताने मानवाला निर्माण केल्याने आपल्या सर्वांचा विधाना एक भगवान आहे असे सांगत. परमेश्वरी कृपेचा लाभ अनेक सेवकांनी शारीरिक दु:खाबरोबर त्यांनी त्यांचे मानसिक, आर्थिक व सामाजिक दु:खही दूर झाली असल्याचे म्हणाले. संचालन धनराज दिघोरे व आभार परसराम दिघोरे यांनी मानले. कार्यक्रमाला गोमा लोहकर, धनराज लोहकर, भीवा काटेखाये, बालू नेवारे, शेखर बिलवणे, चैतन्य नंदपुरे, मनोज वैरागडे, शामलता अहिर, कैलाश गडकर, हिरालाल काटेखाये व सेवक सेविका उपस्थित होते. (वार्ताहर)