शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

शेतकºयांच्या वेदनेवर मीठ चोळू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 22:24 IST

आॅनलाईन कर्जमाफीचा अर्ज दाखल करताना एक ते दीड तास लागतात. एकीकडे खºया शेतकºयांना कर्ज माफी देऊ असे बोलत असले तरी ....

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : भाजप सरकारवर घेतले तोंडसुख, भंडाºयात पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आॅनलाईन कर्जमाफीचा अर्ज दाखल करताना एक ते दीड तास लागतात. एकीकडे खºया शेतकºयांना कर्ज माफी देऊ असे बोलत असले तरी दुसरीकडे बोगस शेतकरी समोर येतील अशी टिंगल उडवून शेतकºयांच्या वेदनांवर मीठ चोळण्याचे काम भाजपचे सरकार करीत आहे. दुष्काळ असतानाही बळीराजाची ही पिळवणूक कदापी खपवून घेतली जाणार नाही, असा कळकळीचा इशाराही आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला.भंडारा येथे शुक्रवारी काँग्रेस पक्षातर्फे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.वडेट्टीवार म्हणाले, सरकारने आॅनलाईन कर्जमाफीची मुदत वाढविली असली तरी अनेक तांत्रीक कारणांमुळे अर्ज सबमिट व्हायला वेळ लागत आहे. कर्जमाफी द्यायची भाजप सरकारची नियत नाही. ना. चंद्रकांत पाटील यांनी, राज्यात दहा लक्ष शेतकरी बोगस असल्याचे सांगून शेतकºयांची थट्टा केली आहे. बोगस शेतकरी असतील तर त्यांची खुशालपणे यादी जाहिर करावी, आम्ही त्याची सहानिशा करु. परंतु असे बोलून सरकारच्या नियतीसोबतच शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळू नये असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला.विकासान्भिमूख अनेक कामे रखडली असल्याचे सांगून वडेट्टीवार म्हणाले, जिल्ह्यातील महत्वपूर्ण रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. दुसरीकडे भारनियमनाचा बडगा जनसामान्यांसह लघु उद्योगांचे कंबरडे मोडत आहे. अपुरा पाऊस असतांना व कोळशाची उपलब्धता पुरेशा प्रमाणात नसताना सरप्लस वीज देण्याची घोषणा कोणत्या आधारावर करण्यात आली, हाही एक संशोधनाचा विषय आहे. वीज बिल भरमसाठ पाठवित असताना व कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडित होत असताना ऊर्जा मंत्र्यांच्या क्षेत्रात ज्या प्रमाणे २४ तास वीज पुरवठा केला जात आहे. तसाच पुरवठा येथील शेतकºयांच्या कृषी पंपानाही मिळाला पाहिजे.नागपूरातील नाग नदीच्या दुषीत पाण्यामुळे वैनगंगेचे पवित्र पाणी फार दुषीत झाले आहे. कोट्यवधींची घोषणा करणाºया मंत्र्यांनी नाग नदीच्या स्वच्छतेबाबत व जलशुध्दीकरणाबाबत का बोलत नाही असा टोलाही आमदार वडेट्टीवार यांनी लगावला.भाजपचेच खासदार सत्तेत असताना विरोधी सुर काढीत आहे. घरात असताना राजकारणात कबड्डी, खो-खो व लंगडी खेळ सुरु आहे काय? याचे उत्तर येणाºया काळात पहायला मिळणार आहे. काँग्रेस पक्षात येणाºया प्रत्येकाचेच आम्ही नेहमी स्वागत केले आहे. हीच काँग्रेसची परंपरा व संस्कृती आहे. खा. नाना पटोले काँग्रेसमध्ये यायला इच्छूक असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करु, असेही बोलायला वडेट्टीवार विसरले नाही.यावेळी पत्रपरिषदेला माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर, प्रदेश सचिव मुजीब पठाण, माजी जिल्हाध्यक्ष मधुकर लिचडे, माजी नगराध्यक्ष बशीर पटेल, डॉ. अजय तुमसरे, सिमा भुरे, जि.प. सदस्य प्रेम वनवे, निलकंठ कायते, प्यारेलाल वाघमारे, महेंद्र निंबार्ते, प्रशांत देशकर आदी उपस्थित होते.