शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वधू मिळेना; भंडारा जिल्ह्यातील वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 11:45 IST

ग्रामीण भागात लग्नाकरिता सर्वत्र मुली पाहण्याची शोध मोहीम सुरू आहे. त्यानिमित्ताने गावागावात मंडई व नाटकाचे आयोजन केले जात आहे. मात्र आता मुलींना भूमिहीन शेतमजूर मुलांना नापसंती सुरू आहे.

ठळक मुद्देव्यथा शेतकरी कुटुंबांची शासकीय नोकरदारांनाच वधूपित्याची पहिली पसंती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ग्रामीण भागात लग्नाकरिता सर्वत्र मुली पाहण्याची शोध मोहीम सुरू आहे. त्यानिमित्ताने गावागावात मंडई व नाटकाचे आयोजन केले जात आहे. मात्र आता मुलींना भूमिहीन शेतमजूर मुलांना नापसंती सुरू आहे. मुलाकडे शेती पाहिजे मात्र मुलगा शेतकरी नको आहे. त्यामुळे पालकवर्गाची मुलीसाठी, मुलांसाठी धावपळ सुरू आहे. परिणामत: पालकाकडून विनवणी केल्या जात आहे की, फक्त मुलगी द्या, लग्न आम्हीच करू हे बोलके चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहेत.पुरूषधान समाजात उपवराचे पुर्वी पारडे जळ असायचे. हुंडा मिळाला नाही किंवा मानपान झाले नाही तर सरळ लग्न मोडण्यापर्यंत मजल असायची. परंतु आता बदलत्या परिस्थितीत मुलीची संख्या घटल्याने मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे.पुर्वी मुलाच्या शोधासाठी मुलीचे पालक मुलगा मिळेल का म्हणून महिना महिना नातेवाईकाच्या घरी फिायचे मात्र आता परिस्थिती बदलली आहे.खर्च आम्हीच करू म्हणून मुलाचे पालक मुलीसाठी वनवन भटकत आहेत. निसर्गाच्या अवकृपेने व शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे प्रत्येक पित्याला वाटते की, आपली मुलगी चांगल्या घरी नांदावी, अशी आशा असते सध्याला ग्रामीण भागातील मुलीच्या पित्याची नजर शहरी भागातील मुलाकडे वळली आहे. श्रीमंत असो की, गरीब असो शेतकरी मुलाला मुलगी देण्यास मुलीचे पिता नकार देत आहेत. त्यामुळे प्रेमप्रकरणात वाढ होत आहे.पवनी तालुक्यातील ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या विवाह इच्छूक मुलांना मुलगी मिळणे कठीण झाले आहे. पुर्वी मुलाचे लग्न लाखो रूपयाची उधळण करून मोठ्या थाटामाटात करीत होते. मात्र आता वाढत्या शेतीच्या कर्जामुळे अल्प खर्चातचच लग्न साध्या पद्धतीने केल्या जात आहे. मुलगी मिळणे कठीण झाल्यामुळे बऱ्याच मुलांनी हुंडा दिल्याचे समजत आहे. मुलगी दाखवून व लग्न जोडून देणाºयांना सुगीचे दिवस आले आहेत.

शेतकरी नवरा नको, पण शेती हवीचच्शेतकरी मुलांना कोणीही मुलगी देण्यास तयार नाहीत. सर्वात प्रथम सरकारी नौकरीवर असलेल्या मुलांना प्राधान्य दिल्या जात आहे. परंतू काही ठिकाणी सध्याला नौकरी सोबत शेती आहे का? असाही प्रश्न पुढे येत आहेत. शेतकरी नवरा नको पण शेती हवीच, असा प्रश्न पुढे येत आहे.

मुलीच्या शोधात वाढतेय वयच्पालोरा परिसरातील अनेक तरूण युवक लग्न करण्याकरिता पुढे आले असता मुलगी मिळत नसल्यामुळे त्यांची वय ३५ ते ४० वर्ष झाली आहे. काही मुलांनी तर तुम्हाला पैसे पाहिजेत असतील आम्ही द्यायला तयार आहोत. लग्नाचा संपूर्ण खर्चही आम्हीच करू फक्त मुलगी द्या, असाही निर्णय घेतानी दिसत आहेत. ही परिस्थिती पालोरा परिसरातच नाही तर तालुक्यात पाहायला मिळत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीmarriageलग्न