लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : स्थानिक श्रीराम नगरात सुरू असलेल्या बियरबारचे बांधकाम तात्काळ बंद करून दिलेली परवानगी रद्द करावी, याकरिता नगरातील महिलांनी आता पुढाकार घेतला आहे. याबाबत महिलांनी नगरसेवकासह नगरपरिषदेत धडक देऊन नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांना निवेदन दिले.निवेदनात श्रीरामनगर हसारा रोड या ठिकाणी बरेचशे प्लॉटची विक्री झाली आहे व आज घडीला तिथे राहण्याकरिता घरेही बांधली जात आहेत. त्याच बरोबर याच रस्त्यांनी सकाळ सायंकाळ महिला युवती व वयोवृद्ध लोक फिरायला जातात. इतकेच नव्हे तर उसर्रा, हसारा, हिंगणा येथील विद्यार्थीनी शाळा कॉलेजला यायला याच मार्गाचा अवलंब करतात. त्याचबरोबर या मार्गावर शाळा, कॉलेज, महाविद्यालय, आयटीआय, मंदिरे आदी सर्व आहेत. त्यामुळे वर्दळीच्या व लोकवस्तीत बियरबार उघडण्याची परवानगी देवू नये तसेच नाहरकत प्रमाणपत्रही देवू नये व सुरू असलेले बियरबारचे बांधकाम तात्काळ बंद करावे अशा आशयाचे निवेदन नगराध्यक्ष प्रदीप पडोळे तथा पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे यांना दिले आहे. यावेळी नगरसेवक राजेश ठाकूर, प्रा. डॉ. प्रियादर्शनी शहारे, सुनिता टेंभुर्णे, शालिनी बागडे, अविता वासनिक, शालिनी मेश्राम, अन्नपुर्ती गोमासे, सरिता गेडाम, गिता धांडे, दिपाली ढोमणे, ममता गौपाले, येनू गौपाले, मालती पारधी, शिल्पा उके, वैशाली बोंद्रे, कांता भगत, अर्चना कटरे, देवांगणा दिघोरे, मनिषा ठाकरे, कविता वरकडे, राघन ठाकरे, पार्वता वरकडेसह असंख्य महिला उपस्थित होत्या.
नवीन बियरबारच्या बांधकामाची परवानगी नाकारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:08 IST
स्थानिक श्रीराम नगरात सुरू असलेल्या बियरबारचे बांधकाम तात्काळ बंद करून दिलेली परवानगी रद्द करावी, याकरिता नगरातील महिलांनी आता पुढाकार घेतला आहे.
नवीन बियरबारच्या बांधकामाची परवानगी नाकारा
ठळक मुद्देनगराध्यक्षांना निवेदन : श्रीराम नगरातील महिलांनी घेतला पुढाकार