शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 06:00 IST

भंडारा येथील खात रोडवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आहे. जिल्हाभरातील शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचा संबंध या कार्यालयाशी येतो. गत अनेक वर्षांपासून सदर कार्यालय भाड्याच्या इमारतीत आहे. गुरुवारी दुपारी या कार्यालयाला भेट दिली तेव्हा धक्कादायक वास्तव पुढे आले. कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासूनच अव्यवस्थेचे दर्शन होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय असे फलक असलेल्या प्रवेशद्वाराजवळ अवकाळी पावसाने तळे साचले होते.

ठळक मुद्देकार्यालय धुळीने माखले : ठिकठिकाणी फाईलचा खच, वीज तारा अस्ताव्यस्त, स्टोर रुमचा अभाव

देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संपूर्ण जिल्ह्याच्या कृषी विभागाचा कारभार पाहणाऱ्या येथील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाचा कारभार रामभरोसे आहे. प्रवेशद्वाराजवळ साचलेले पाण्याचे डबके, आवारात अस्ताव्यस्त उभी असलेली वाहने, कार्यालय फाईलींचा खच आणि सर्वत्र पसरलेली धुळ असे चित्र गुरुवारी दुपारी २ वाजता दिसून आले. अधिकारी कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या ओस असल्याने याबाबत विचारणा केली तर कृषीमंत्र्याच्या नागपूर बैठकीची तयारीत सर्व व्यस्त असल्याचे येथे उपस्थित एका कर्मचाऱ्याने सांगितले.भंडारा येथील खात रोडवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आहे. जिल्हाभरातील शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचा संबंध या कार्यालयाशी येतो. गत अनेक वर्षांपासून सदर कार्यालय भाड्याच्या इमारतीत आहे. गुरुवारी दुपारी या कार्यालयाला भेट दिली तेव्हा धक्कादायक वास्तव पुढे आले. कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासूनच अव्यवस्थेचे दर्शन होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय असे फलक असलेल्या प्रवेशद्वाराजवळ अवकाळी पावसाने तळे साचले होते. तर प्रवेशद्वारातच बंद असलेले वाहन आणि दुचाकी अस्ताव्यस्त उभ्या होत्या. या वाहनांच्या गराड्यातून वळसा घेत दुसऱ्या मजल्यावर जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा जीन्याजवळ विजेच्या तारांचे भेंडोळे दिसून आले. पायºयावरून चढताना प्रचंड धुळ दिसत होती. पायºयाप्रमाणे कार्यालयातही धुळीचे साम्राज्य दिसून आले. दुपारचे दोन वाजल्याचे घड्याळात दिसत असले तरी बहुतांश खुर्च्या रिकाम्या पडलेल्या होत्या.या कार्यालयात ठिकठिकाणी अस्ताव्यस्त ठेवलेल्या फाईली दिसत होत्या. स्वच्छतेबाबत कोणतेही उपाय येथे दिसत नव्हते. उलट कार्यालय रस्त्यावर असल्याने धुळ येणारच असे समर्थन तेथे उपस्थित एका कर्मचाऱ्याने केले. विशेष म्हणजे जिल्हा अधीक्षक अधिकारी कार्यालय असल्याने या ठिकाणी जिल्ह्यातील कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या वारंवार बैठकी होतात. परंतु त्या संदर्भात कोणतीही व्यवस्था दिसून आली नाही. कार्यालयाचे कोपरे जळमटांनी भरलेले होते. संपूर्ण जिल्ह्याचा कारभार पाहणाऱ्या कार्यालयाची अवस्था अतिशय दयनीय असल्याचे लोकमतने केलेल्या स्टींग आॅपरेशनमुळे उघडकीस आले.रिकाम्या टेबल, खुर्च्या पाहून येथे उपस्थित एका कर्मचाºयाला याबाबत विचारणा केली तर शुक्रवारी नागपूर येथे कृषीमंत्र्यांची बैठक असून या बैठकीच्या तयारीत सर्व व्यस्त आहेत. आज आमची धावपळ सुरु असल्याचे सांगितले तर जिल्हा कृषी अधीक्षक हिंदूराव चव्हाण एका मिटींगमध्ये व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. या कार्यालयाच्या अनेक सुरस कथा सांगितल्या जातात. येथे येणाºया शेतकºयांना सौजन्याची वागणूक मिळत नसल्याची ओरड कायम असते. याचा प्रत्यय गुरुवारी ‘लोकमत’ प्रतिनिधीलाही आला. अवकाळी पावसाच्या नुकसानीसंदर्भात सर्वेक्षणाबाबत कुठलीही हालचाल दिसली नाही. एका कर्मचाºयाने लाखनी तालुका कृषी अधिकाºयाचा मोबाईल क्रमांक देऊन त्यांच्याकडून माहिती घेण्याचा सल्ला दिला. एकंदरीत जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय रामभरोसे असल्याचे दिसून आले.चालकाअभावी वाहन जागेवरच उभेसंपूर्ण जिल्ह्याच्या कृषी विभागाचा कारभार नियंत्रित करण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाचे वाहन कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच उभे होते. त्यावर मोठ्या प्रमाणात धुळ साचलेली होती. गेल्या कित्येक दिवसांपासून या वाहनाचा उपयोग झाला नसल्याचे दर्शनी परिस्थितीवरून दिसत होते. याबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा धक्कादायक वास्तव पुढे आले. गत अनेक महिन्यांपासून जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाला चालक नसल्याचे सांगण्यात आले. चालकच नसल्याने हे वाहन तेथे कायमस्वरुपी उभे असते. याबाबत जिल्हा कृषी अधीक्षकांशी संपर्क साधला असता चालक नसल्याने वाहन बंद असल्याचा दुजोरा देत लवकरच कंत्राटी वाहनचालकाची नियुक्ती करण्यात येईल. वाहन सुस्थितीत असल्याचे सांगण्यास मात्र ते विसरले नाही. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून वाहन जागेवरच उभे असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :agricultureशेती