भंडारा शहरातील गांधी चौक येथून या जनजागृती रॅलीला सुरुवात करण्यात आली. गांधी चौकातून बडा बाजार या मुख्य रस्त्यावरून, तसेच मुस्लीम लायब्ररी, बसस्थानक परिसरात, त्रिमूर्ती चौक मार्गावरून पथसंचलन करून कोरोना नियमांचे पालन करण्याविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी दुकानदारांना, तसेच व्यापाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले. यावेळी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना समज देण्यात आली.
वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी रिक्षाचालक, तसेच इतर वाहनधारकांना वाहन चालवताना मास्कचा वापर, तसेच शासनाने ठरवून दिलेल्या वेळेचे पालन करावे; अन्यथा कडक कारवाईचा इशाराही यावेळी दिला.
भंडारा पोलीस ठाण्याचे ठाणेदार लोकेश काणसे यांनी भंडारा शहरातील नागरिकांनी पोलीस प्रशासन, तसेच जिल्हा प्रशासनाला कोरोना नियमांचे पालन करून, तसेच मास्क, सॅनिटायझरचा प्रभावी वापर करून कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी कोणीही कायद्याचे उल्लंघन करणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन केले. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्रीधर शहारे, पोलीस कर्मचारी स्वप्नील गुल्हाने, गीते, डोईफोडे यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. संचालन भंडाराचे ठाणेदार लोकेश काणसे यांनी केले, तर आभार वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी मानले.