शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

जिल्ह्यात आतापर्यंत ६१२.४ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 05:00 IST

१ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यात सरासरी ६३८.८ मिमी पाऊस अपेक्षित असतो. आतापर्यंत ६१२.४ म्हणजे सरासरीच्या ९६ टक्के पाऊस झाला आहे. गत २४ तासात जिल्ह्यात ४०.८ मिमी पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस लाखनी तालुक्यात ८४.२ मिमी झाला आहे. त्या खालोखाल साकोली ६० मिमी, मोहाडी ३० मिमी, भंडारा ३१.२ मिमी, तुमसर १९.२ मिमी, लाखांदूर २४.४ मिमी पाऊस कोसळला आहे. गत दोन दिवसापासून पाऊस बरसत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.

ठळक मुद्देसरासरीच्या ९६ टक्के : गत २४ तासात ४०.८ मिमी

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  जिल्ह्यात आतापर्यंत ६१२.४ मिमी पावसाची नोंद झाली असून हा सरासरीच्या ९६ टक्के आहे. तर गत २४ तासात ४०.८ मिमी पावसाची नोंद झाली. रिमझीम पाऊस बरसत असला तरी आता जिल्ह्यात रोवणीला वेग येणार आहे.मात्र शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.जिल्ह्यात यावर्षी पावसाने शेतकऱ्यांची निराशा केल्याचे दिसत आहे. दरवर्षी जुलै महिन्यात दमदार पाऊस कोसळतो. परंतु मध्यंतरी तीन आठवडे पावसाने दडी मारली होती. गत चार दिवसांपासून रिमझीम पाऊस बरसत आहे. असे असले तरी जिल्ह्यात आतापर्यंत ६१२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यात सरासरी ६३८.८ मिमी पाऊस अपेक्षित असतो. आतापर्यंत ६१२.४ म्हणजे सरासरीच्या ९६ टक्के पाऊस झाला आहे. गत २४ तासात जिल्ह्यात ४०.८ मिमी पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस लाखनी तालुक्यात ८४.२ मिमी झाला आहे. त्या खालोखाल साकोली ६० मिमी, मोहाडी ३० मिमी, भंडारा ३१.२ मिमी, तुमसर १९.२ मिमी, लाखांदूर २४.४ मिमी पाऊस कोसळला आहे. गत दोन दिवसापासून पाऊस बरसत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. यामुळे रोवणीला वेग आला आहे.

गोसे धरणाचे १५ दरवाजे उघडले- पवनी तालुक्यातील गोसे प्रकल्पातील पाण्याची पातळी कायम राखण्यासाठी गत आठ दिवसापासून प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात येत आहेत. शुक्रवारी १९ दरवाजे उघडण्यात आले होते. दरम्यान शनिवारी चार दरवाजे बंद करण्यात आले. आता १५ दरवाजे अर्धा मीटरने उघडे असून त्यातून १६२६.५७ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.

 

टॅग्स :RainपाऊसGosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प