शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

जिल्हाधिकाऱ्यांनी केली नवोदयची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 23:18 IST

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) मोहाडीच्या महिला प्रशिक्षण भवनात अखेर नवोदय विद्यालयाचे स्थानांतरण करण्यात येवुन विद्याअर्जनाला सुरुवात झाली आहे. मात्र माविम भवनाच्या विस्तारित प्रांगणात मागच्या बाजुला मोठमोठे गवत झुडपे वापलेली आहेत व तेथेच काही विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे. घनदाट गवतामुळे साप, विंचु यासारखे सरपटणारे प्राण्यांचा त्रास होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांसोबत केली चर्चा : संपूर्ण परिसरात जंगली झुडपी, धोका होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) मोहाडीच्या महिला प्रशिक्षण भवनात अखेर नवोदय विद्यालयाचे स्थानांतरण करण्यात येवुन विद्याअर्जनाला सुरुवात झाली आहे. मात्र माविम भवनाच्या विस्तारित प्रांगणात मागच्या बाजुला मोठमोठे गवत झुडपे वापलेली आहेत व तेथेच काही विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे. घनदाट गवतामुळे साप, विंचु यासारखे सरपटणारे प्राण्यांचा त्रास होण्याची शक्यता आहे.नवोदयचे स्थांनातरण करण्यापुर्वी हा भाग स्वच्छ केला असता तर उत्तम झाले असते असे सर्वच विद्यार्थ्यांच्या पालकांचे म्हणणे होते. नवोदयचे स्थानांतरण मोठ्या घाईने करण्यात आल्याचीही तक्रार पालकांनी केली. संपुर्ण माविम परिसराची व खोल्यांची पाहणी जिल्हाधिकारी गोयल यांनी करुन प्राचार्यांना व मोहाडी तहसीलदारांना काही निर्देश सुध्दा दिले.नवोदय विद्यालयाच्या तिढा अनेक दिवसापासुन सुरु असून यासाठी पालक व विद्यार्थी उपोषणावर सुध्दा बसले आहेत. पालकांनी उपोषणाचे अस्त्र उगारल्यावर प्रशासनाला कोठे जाग आली व मग जागेसाठी धावपळ सुरु करण्यात आली. प्रथम अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात स्थानांतरण करण्यात आले पण तिथे सुध्दा अपुºया जागेमुळे विद्यार्थ्यांना ती जागा सोडावी लागली. शेवटी मोहाडी येथील माविमच्या दोन मजली प्रशस्त इमातरीला नवोदय विद्यालयासाठी निवडण्यात आले. नवोदय विद्यालय येथे काही वर्षासाठी तरी स्थाई रुपात चालेल अशी अपेक्षा आहे. माविम भवनाचा मागे दोन गेस्ट हाऊस आहेत. या गेस्ट हाऊसमध्ये कोणीही राहत नसल्याने परिसरात झुडपी वाढली आहेत. वटवाघुळ व गणवल माशीने गेस्टहाऊसच्या आतल्या भागात घर बनविले आहे. आणि या ठिकाणीच विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी येण्याच्या काही तास अगोदर गणवेल माशिनने पुळके व जाळे काढण्यात आले. हा संपुर्ण परिसर स्वच्छ करुन दोन दिवसानंतर सोमवारला येथे विद्यार्थ्यांना आणले असते तर बरे झाले असते, असे पालकांचे म्हणणे होते.महिलांच्या प्रशिक्षणाला अडचणमाहिला आर्थिक विकास महामंडळतर्फे प्रत्येक तालुक्यात सीएमआरसी केंद्र उघडण्यात आले आहे. साधारणत: एका सीएमआरसी अंतर्गत दोन ते तीन हजार महिला बचतगटाद्वारे आर्थिक उन्नती साधत आहेत. मोहाडी सीएमआरसी अंतर्गत तीन हजार ७०० महिला कार्य करीत आहेत. या महिलांना माविम भवनात गृहउद्योगाचे प्रशिक्षण दिले जाते. नवोदय मुले या महिलांना प्रशिक्षणात अडचण येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.आंदोलनाचा १८ वा दिवसभंडारा : आधी नवोदयच्या जागेसाठी तर आता उपोषणकर्त्या आंदोलकांनी विद्यार्थ्यांचा पुर्व परिक्षेचा निकाल लावावा या मागणीसाठी उपोषण सुरुच ठेवले आहे. आंदोलनाला अठरा दिवस पूर्ण झाले असून निकाल लागेपर्यंत उपोषण सुरुच राहील, असे स्पष्ट केले आहे. माविमची उपलब्ध करुन देण्यात आलेल्या इमारतीत तीन वर्षांपर्यंत नवोदय विद्यालय असावे अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दरम्यान माविमच्या इमारतीत सोयीसुविधा पुर्ण नसल्याचे आंदोलनकर्ते तथा सिनेट सदस्य प्रविण उदापुरे यांचे म्हणणे आहे.विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान होत असल्याने त्वरित विद्यार्थ्यांना माविम भवनात स्थानांतरीत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही जागा सोयीस्कर आहे. काही समस्या असतील तर नगरपंचायत व तहसीलदार यांच्या सहकार्याने त्या सोडविण्यात येतील. विद्यार्थ्यांना येथे काही त्रास होणार नाही.- शांतनु गोयल,जिल्हाधिकारी भंडारानियमानुसार नवोदयसाठी जी काही सोय करता येईल ती आम्ही अवश्य करु. विद्यार्थ्यांच्या हितासाठी कोणीही याचा विरोध करणार नाही.- स्नेहा करपे,मुख्याधिकारी, न.प. मोहाडी