शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

जिल्हाधिकाऱ्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:18 IST

विविध उपक्रमात विद्यार्थी मनापासून भाग घेतात. उत्कृष्ट कार्य करतात.

ठळक मुद्देएक दिवस विद्यार्थ्यांसोबत उपक्रम : मोहगाव देवी शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : विविध उपक्रमात विद्यार्थी मनापासून भाग घेतात. उत्कृष्ट कार्य करतात. त्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत बालकदिनी ‘एक दिवस विद्यार्थ्यांसोबत’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी राबविला. याशिवाय जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी महात्मा ज्योतिबा फुले हायस्कुल व जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मोहगाव देवी येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.जिल्ह्यात बºयाच शाळांमध्ये नवोपक्रम राबविले जातात. ते नवोपक्रम शाळांपुरते मर्यादित राहतात. त्या नवोपक्रमाची दखल क्वचितच घेतली जाते. परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यवंशी यांनी ‘एक दिवस विद्यार्थ्यांसोबत’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम सुरु केला. मोहगाव देवी येथे पाणीपुरवठा व्हावा यासाठी सूर नदीवर वनराई बंधारा तयार करण्यात यावा, असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. सुर्यवंशी यांनी ही संकल्पना वास्तवात आणली.सप्टेंबर महिन्यात महात्मा ज्योतिबा फुले हायस्कुल मोहगाव देवी, जिल्हा परिषद केंद्रीय पूर्व माध्यमिक शाळा मोहगाव देवी येथील शाळेच्या बालकांच्या चिमुकल्या हाताने वनराई बंधारा तयार करण्यात आला. त्याचवेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांची नावे कळविण्याचे निर्देश गटविकास अधिकारी कृष्णा मोरे यांना दिले होते. बालक दिनाचे औचित्य साधून मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी एक दिवस बालकांसोबत या उपक्रमाला सुरुवात केली. यात जिल्ह्यातील निवडक शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश होता.महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील विद्यार्थिनी साक्षी पंचबुद्धे, प्राजक्ता ठवकर, आचल लेंडे, सोनाली चकोले, जान्हवी लांबट यांच्यासह शिक्षक गजानन वैद्य, शोभा कोचे तसेच जि.प. शाळा मोहगाव देवीचे विद्यार्थी छबीता भोयर, अपोशना डोंगरे, अर्पिता मुळे, अश्विना पडोळे, भाग्यश्री मडामे व शिक्षक किशोर कांबळे, माधवी नंदनवार यांनी सहभाग घेतला.विद्यार्थ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या दालनात प्रवेश केला. सीईओंनी त्यांनी केलेल्या कार्याचे प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. शैक्षणिक अडचणी, समस्या याबाबत संवाद साधला. विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या कामकाजाची ओळख व्हावी यासाठी अधिनस्त संपूर्ण विभागाचा कारभार बघता आला. अधिकाºयांच्या प्रत्यक्ष भेटी घेता आल्या. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांच्याशी भेट घालून दिली. त्यानंतर सीईओ यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याशी भेट घालून दिली. जिल्हाधिकारी एका कार्यक्रमात व्यस्त असतानाही विद्यार्थ्यांसोबत काही वेळ घालवत शैक्षणिक विषयावर संवाद साधला.या उपक्रमाने आपण नवीन जगात गेलोय, वेळेची महती, शिक्षण घेऊन मोठे होण्याचे बळ, प्रेरणा मिळाल्याची प्रतिक्रिया दहावीची विद्यार्थिनी साक्षी पंचबुद्धे, प्राजक्ता ठवकर, आचल लेंडे, जानवी लांबट, सोनाली चकोले यांनी व्यक्त केली. अविस्मरणीय क्षणाचा गाठोळा बांधून मुले शाळेत परतली तेव्हा त्यांच्या चेहºयावरचे तेज अनुभूती देत होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अधिकारी होण्याची पे्रेरणा व सामाजिक बांधिलकीची जाणीव होईल, अशी प्रतिक्रिया उपक्रमात सहभागी शिक्षक गजानन वैद्य, शोभा कोचे यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केल्या.