शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बॉईज संघटनेचा जिल्हा कचेरीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 22:14 IST

मोहाडी तालुक्यातील रोहा येथे रेती माफियांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला करून गंभीर जखमी केले. कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिसांवरच असे हल्ले होत असतील तर सामान्य नागरिकांचे काय?

ठळक मुद्देपोलिसांवरील हल्ला प्रकरण : सीआयडीकडे तपास देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मोहाडी तालुक्यातील रोहा येथे रेती माफियांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला करून गंभीर जखमी केले. कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिसांवरच असे हल्ले होत असतील तर सामान्य नागरिकांचे काय? या घटनेचा निषेध करण्यासाठी तथा या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यासह अन्य मागण्यांसाठी पोलिस बॉईज असोसिएशन व सेवानवृत्त पोलिस कर्मचारी, अधिकारी कल्याणकारी असोसिएशनच्या वतीने मंगळवारला जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.१ आॅगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास रोहा येथे रेती माफियांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर लोखंडी रॉडने हल्ला केला होता. यामध्ये एक अधिकारी व कर्मचारी जखमी झाले. यातील एक कर्मचारी गंभीर जखमी झाल्याने नागपूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. माफियांकडून पोलिसांवर हल्ले सुरूच आहेत. आज पोलिसांवरच असे हल्ले होत राहीले तर समाजाचे रक्षण कोण करेल? अशा घटनांमुळे पोलिसांचे व त्यांच्या कुटुंबियांचे मनोबल खचेल, अशी भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात रेती माफियांनी चांगलाच उच्छाद माजविला असून ते कुणाचीही तमा बाळगत नाहीत. वारंवार होणाºया हल्ल्यांमुळे त्यांनी पोलिस आणि महसूल विभागालाच आव्हान दिले आहे. यावर आळा घालणे आवश्यक आहे.रोहा येथील घटना निषेधार्थ असून या घटनेचा तपास सीआयडीला सोपविण्यात यावा, गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, घटनेच्या दिवशी उशिरा गुन्हा दाखल का झाला, याची चौकशी करण्यात यावी, जखमी पोलिस हवालदार मडामे यांना शासनाने सर्वाेतोपरी मदत करावी, पोलिसांवर होणाºया हल्ल्याकरीता जलदगती न्यायालय बनवावे, या मागणीसाठी पोलिस बॉईज व सेवानवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांमार्फत निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनचे उपविभागीय पोलिस अधिकारी इलमकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक यादव, सचिन नवखरे, पुंडलिक निखाडे, भोवते, कोरे, तरोणे, अमरसिंग राठोड, धनराज कोचे, रवि लांजेवार, पटले, मडावी, पुराम, तिरबुडे, ठोंबरे, दोनोडे, प्रमिला तिरपुडे, मनोरमा, पोलिस बॉईज असोसिएशनचे जयराम बावने, ज्ञानेश्वर वाघमारे, इंदू मडावी, वैभव आदमने, सचिन भोंडे, रोहीत हलमारे, सचिन बावने आदी उपस्थित होते.