ऑनलाईन लोकमतभंडारा : तंबाखुजन्य व मादक पदार्थाच्या सेवनामुळे होणाºया दुर्धर आजारापासून अधिकारी कर्मचाºयांमध्ये जागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यसनाविरूध्द एल्गार पुकारला आहे. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनात निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या कल्पकतेतून प्रशासनाने अभिनव अभियान सुरू केले आहे.तंबाखु, खर्रा, गुटखा व सिगारेट या व्यसनाची माहिती व दुष्परिणाम सांगण्यासाठी प्रत्येक विभागात जावून जागृती अभियानाचा आज जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी कलापथकाच्या माध्यमातून व्यसनाचे दुष्परिणाम सांगण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, डॉ. मनिष बत्रा, अधिक्षक अक्षय पोयाम, अधिकारी, कर्मचारी व असर फाऊंडेशनचे सदस्य या अभियानात सहभागी झाले होते.महाराष्ट्रातील तंबाखु सेवनाचे प्रमाण अतिशय चिंताजनक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार महाराष्ट्रात ४२.५ टक्के पुरूष व १८.९ टक्के स्त्रिया तंबाखुचे सेवन करतात. १३ ते १५ वर्ष वयोगटामध्ये १३ टक्के विद्यार्थी तंबाखुचा वापर करतात. एकूण विद्यार्थ्यांपैकी १०.२ टक्के मुले व ११.१ मुली तंबाखुचा वापर करतात. तरुण मुले सरासरी वयाच्या १७, १८ वर्षांपासून तंबाखु सेवन सुरू करतात. २५.८ टक्के मुली त्यांचे वय १५ वर्ष होण्यापूर्वीच तंबाखु सेवन सुरु करतात. या आकडेवारीचा विचार करता जिल्हा प्रशासनाने प्रत्येक विभागात जाऊन व्यसनमुक्तीसाठी जागृती अभियान हाती घेतले आहे. प्रत्येक व्यक्तीला जागृत करण्याच्या या अभियानाचा शुभारंभ शासकीय कार्यालयापासून सुरु झाला आहे. यात निवासी उपजिल्हाधिकारी यांनी स्वत: पुढाकार घेवून आज जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रत्येक विभागात जाऊन व्यसनमुक्तीचे महत्व पटवून दिले. यासाठी कलापथकाचा आधार घेण्यात आला. तत्पुर्वी तंबाखुमुक्ती अभियानाचे परिपत्रक प्रत्येक कार्यालयास पाठविले आहे. या नंतर कार्यालयात तंबाखुजन्य पदाथार्चे सेवन करताना आढळल्यास संबंधितांकडून दंड आकारण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ही चांगली सुरुवात असून व्यसनमुक्तीच्या दिशेने टाकलेले प्रशंसनीय पाऊल आहे.होळी व्यसनाचीव्यसनमुक्त अभियानाच्या निमित्ताने गुरूवारला जिल्हाधिकारी कार्यालयात अनोख्या होळीचे आयोजन करण्यात आले. अधिकारी, कर्मचारी यांनी आज होळी साजरी केली मात्र व्यसनमुक्त होण्याची शपथ घेतली. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना व्यसनमुक्त होण्याची शपथ दिली. ही अनोखी होळी जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली. तसेच संगणकाचा वापर शासकीय कार्यालयात करण्यात आला असून जिल्हाधिकारी कार्यालयात पेपरलेस संकल्पना राबविण्याचे ठरविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी निवडणूक विजय उरकुडे, जिल्हाधिकारी जी.जी. जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे,जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक संजय बरडे, सहाय्यक पुरवठा अधिकारी धनंजय देशमुख, अधिक्षक अक्षय पोयाम यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
व्यसनमुक्तीसाठी जिल्हा प्रशासनाने पुकारला एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:46 IST
तंबाखुजन्य व मादक पदार्थाच्या सेवनामुळे होणाºया दुर्धर आजारापासून अधिकारी कर्मचाºयांमध्ये जागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यसनाविरूध्द एल्गार पुकारला आहे.
व्यसनमुक्तीसाठी जिल्हा प्रशासनाने पुकारला एल्गार
ठळक मुद्देलोकमत शुभवर्तमान : प्रशासनाचा अभिनव उपक्रम, व्यसनाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती