संतोष जाधवर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संकटाच्या काळात बँकात होणारी गर्दी लक्षात घेता डाक विभागाने इंडियन पोस्ट पेमेंट बँक संकल्पना आणली. त्याचा लाभ लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात झाला. मार्च महिन्यापासून आतापर्यंत इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून तीन कोटी नऊ लाख रूपयांचे घरपोच वितरण करण्यात आले. जिल्ह्यातील १४०६ व्यक्तींनी याचा लाभ घेतला.पुर्वी पोस्ट आणि सर्वसामान्यांच भावनिक नाते जुळले होते. सुख, दु:खाचे संदेश घेवून पोस्टमन दारात यायचा. पोस्टमनची अनेक जण आतुरतेने वाट पाहायची. परंतु बदलत्या काळात इंटरनेट आणि मोबाईलने पोस्टाचे महत्व तसे कमी झाले. मात्र डाक विभागानेही आधुनिक काळाशी जुळते घेत बदल स्विकारला. विविध योजनांमध्ये अमुलाग्रह बदल घडून आणले. त्यामुळे पोस्टाला आता पुन्हा सुवर्ण दिवस येऊ पाहत आहे.भारतीय पोस्ट पेमेंट बँकेमार्फत पुरविल्या जाणाऱ्या एईपीएस (आधार अनेबल पेमेंट सिस्टिम) सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांना घरपोच रक्कम मिळते. या माध्यमातून ग्राहकाचे पोस्टात खाते नसतानाही बँक खात्यातून पैसे काढू शकतात. एईपीएस रोख पैसे काढणे, फंड ट्रान्सफर, मिनी स्टेटमेंट, बॅलन्स इंक्वायरी असे पाच प्रकारचे व्यवहार करता येतात. यासाठी योग्य ती खबरदारी घेत ग्राहकाचे आधारकार्ड लिंक असलेले बँक खाते, आधार नंबर, मोबाईल क्रमांक, फिंगर प्रमाणिकरण केले जाते. विनाशुल्क दहा हजार रक्कम काढता येते.जिल्ह्यात १३७ टपाल कार्यालय आहे. २०० हून अधिक पोस्टमन आणि ग्रामीण डाकसेवक कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून घरबसल्या ग्राहकांना पैसे मिळत आहे. परिणामी बँकातील गर्दीही कमी होत आहे. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात २३ मार्च ते ११ आॅगस्ट या कालावधीत जिल्ह्यात तीन कोटी नऊ लाख रूपये एईपीएस सिस्टीमच्या माध्यमातून आतापर्यंत वितरित केली आहे.कोरोना संकटाच्या काळात पोस्टाने जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पोस्टमन कडून घरबसल्या पैसे मिळत असल्याने बँकात गर्दी कमी झाली. यामाध्यमातून अनेक जण घरबसल्या पैसे काढत आहेत. पोस्टाच्या विविध योजना आता अत्याधुनिक झाल्या असून त्याचाही लाभ मिळत आहे.-वैभव बुलकुंदे, शाखा प्रबंधक,भारतीय पोस्ट पेमेंट बँक, भंडारा.
कोरोना संकटात पोस्ट पेमेंट बँकेतून तीन कोटींचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:01 IST
पुर्वी पोस्ट आणि सर्वसामान्यांच भावनिक नाते जुळले होते. सुख, दु:खाचे संदेश घेवून पोस्टमन दारात यायचा. पोस्टमनची अनेक जण आतुरतेने वाट पाहायची. परंतु बदलत्या काळात इंटरनेट आणि मोबाईलने पोस्टाचे महत्व तसे कमी झाले. मात्र डाक विभागानेही आधुनिक काळाशी जुळते घेत बदल स्विकारला. विविध योजनांमध्ये अमुलाग्रह बदल घडून आणले. त्यामुळे पोस्टाला आता पुन्हा सुवर्ण दिवस येऊ पाहत आहे.
कोरोना संकटात पोस्ट पेमेंट बँकेतून तीन कोटींचे वितरण
ठळक मुद्देघरपोच सेवा : १४०० व्यक्तींनी घेतला लाभ, बँकातील गर्दी टाळण्यात यश