शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

सर्वच दिव्यांगांना करणार साहित्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 10:52 PM

जिल्ह्यातील सर्वच दिव्यांगाना आवश्यक त्या सर्व साहित्यांचे वाटप करण्यात येणार असून एकही लाभार्थी यातून सुटणार नाही. त्यासाठी आवश्यक तो निधीही उपलब्ध करुन दिला जाईल, असे प्रतिपादन आमदार डॉ.परिणय फुके यांनी केले.

ठळक मुद्देपरिणय फुके : भंडाऱ्यांत महिला रुग्णालयाचे भूमिपूजन लवकरच होणार

आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्ह्यातील सर्वच दिव्यांगाना आवश्यक त्या सर्व साहित्यांचे वाटप करण्यात येणार असून एकही लाभार्थी यातून सुटणार नाही. त्यासाठी आवश्यक तो निधीही उपलब्ध करुन दिला जाईल, असे प्रतिपादन आमदार डॉ.परिणय फुके यांनी केले. जिल्हा रूग्णालय व जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग साहित्य वितरण व मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी आ.रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, जिल्हा परिषद सदस्य रामराव कारेमोरे, दिलीप उके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवीशेखर धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनिता बढे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.चाचेरकर, रवी वानखेडे, तिलक वैद्य, सदानंद इलमे, डॉ.बावनकर, बाळा अंजनकर, दिव्यांगाची अ‍ॅम्बेसिडर अश्वकला चौधरी उपस्थित होते.यावेळी डॉ.फुके म्हणाले, महिला रूग्णालयाचा प्रस्ताव मंजूर झाला असून लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. जिल्ह्यातील २५ हजार दिव्यांगांमधील ज्यांचे हात किंवा पाय व्यवस्थित चालत नाही त्यांना बॅटरी आॅपरेटेड सायकल वाटप करण्याचा आपला मानस आहे. कृत्रिम अवयव देण्यासाठी लवकरच कॅम्प घेण्यात येणार आहे. या शिबिरात पाच हजार दिव्यांगांना आवश्यक साहित्याचे वाटप करायचे आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल व दिव्यांगांना सर्व प्रकारचे साहित्य वाटप करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे म्हणाले, मागील वर्षभरापासून दिव्यांगांसाठी विविध शिबिर राबविण्यात येत आहे. प्रमाणपत्र आधारकार्ड वितरण करण्यात आले. त्याच बरोबर या शिबिराद्वारे ज्याज्या अपंगांना जेजे साहित्य आवश्यक आहे ते वितरित करण्यात येणार असून उपचार, शस्त्रक्रियासुद्धा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात लोकप्रतिनिधी व प्रशासन यांचे समन्वय योग्य असल्यामुळे जिल्ह्यात चांगले काम होत आहे. जिल्हा विकास निधीतून आरोग्य सेवेला प्राधान्य देऊन जास्तीत जास्त निधी खर्च करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी माड्युलर ओटी मशिनचे, रक्तदान शिबिर, आरोग्य प्रदर्शनीचे उदघाटन करून दिव्यांगाना व्हिल चेअरचे वाटप करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, रवी वानखेडे यांची समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवीशेखर धकाते यांनी केले. संचालन डॉ.शांतीदास लुंगे यांनी केले. या कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.