लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : येथील जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या कक्षात हत्तीरोग दुरीकरणासाठी सामुदायीक औषधोपचार मोहिमेंतर्गत पदाधिकाऱ्यांना औषधी खाऊ घालण्यात आले.याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, उपाध्यक्ष विवेकानंद कुर्झेकर, आरोग्य सभापती रेखा ठाकरे, धनेंद्र तुरकर, रेखा वासनिक, जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते, प्यारेलाल वाघमारे, नरेश डहारे, चंद्रप्रकाश दुरूगकर मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अदिती त्याडी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद मोटघरे उपस्थित होते. यावेळी डॉ. अदिती त्याडी यांनी ही मोहीम ग्रामीणस्तरावर २ मार्च ते १२ मार्च व शहरीस्तरावर २ मार्च ते २० मार्च या कालावधीत राबविण्यात येणार आहे.त्यानंतर पाच दिवस मॉपअप राऊंडमध्ये अनुपस्थित व नकार देणाऱ्यां लाभार्थ्यांना गोळ्या खाऊ घातल्या जाणार आहेत. या गोळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जावून तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, गाव, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथे संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा तसेच वयोमानाप्रमाणे डीईसी, आयव्हरमक्टीन व अॅल्बेंडाझोल गोळ्यांचे सेवन जेवणानंतर करावे. १०० टक्के उद्दीष्टपूर्तीच्या दृष्टीने सहकार्य करावे, असे आवाहन केले.संचालन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद मोटघरे, तर आभार प्रदर्शन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अदिती त्यागी यांनी केले.
जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना दिले हत्तीरोग दूरीकरणाची औषधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 05:00 IST