शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

भंडारा नगरपालिका बरखास्त करा

By admin | Updated: May 18, 2016 00:34 IST

ठोक बाजाराच्या नावावर पैसा लाटण्यासाठी मिळविलेली जमीन शासनाची परवानगी न घेता सर्वसाधारण सभेत ठराव ....

प्रकरण मार्केट जागेवरील बांधकामाचे भंडारा : ठोक बाजाराच्या नावावर पैसा लाटण्यासाठी मिळविलेली जमीन शासनाची परवानगी न घेता सर्वसाधारण सभेत ठराव पारित करुन भाडेतत्त्वावर हस्तांतरीत करण्यात आलेली जमीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर शासनजमा करण्यात आली. अशा तकलादू निर्णय घेणाऱ्या भंडारा नगरपालिकेच्या प्रशासनाला बरखास्त करुन संबंधितांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपने विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत केली आहे. यावेळी भाजपचे डॉ. प्रकाश मालगावे, आबीद सिद्दीकी, विकास मदनकर, शितल तिवारी, अरुण भेदे, आशु गोंडाणे उपस्थित होते. विशेष म्हणजे या प्रकरणाला घेवून नगर परिषदेने केलेल्या फसवणुकीबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १४ मे रोजी भाजपच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. डॉ. मालगावे म्हणाले, भंडारा पालिकेने जलशुध्दीकरण संयत्र व बगीच्यासाठी शासनाने दिलेल्या भंडारा नझुल शिट नं. ५४ भूखंड क्रमांक २०/४ आराजी १.५० एकर जागेला पालिकेने बेकायदेशीररित्या ठराव करुन सदर जमीन बीटीबी भाजीपाला व्यापारी अशोसिएशन या संस्थेबरोबर भाजीमार्केट बांधकामासाठी करारनामा २४ जुलै रोजी करण्यात आला. या सर्व प्रक्रियेत गंभीर अनियमितता केली असल्याचे मत जिल्हाधिकारी यांनी नोंदवून सदर जागा शासनास परत करण्याविषयी व जागेवर सुरु असलेले बांधकाम तातडीने थांबविण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्या आदेशाचे पालनही करण्यात आले. स्वमालकीची जागा नसतानाही परस्पर जाहिरात देवून जागा हस्तांतरीत करण्याचा ठराव करणे, न.प. च्या सर्व सदस्यांवर मुख्यधिकारी यांच्यावर फौजदारी कार्यवाही करण्यात यावी, प्रक्रियेत झालेला भष्ट्राचार शोधून काढणे तसेच सदर प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे किंवा भ्रष्टाचार निरोधक कक्षाकडे हस्तांतरण करावे अशी मागणी पत्रपरिषदेत करण्यात आली. (प्रतिनिधी)