शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

वारपिंडकेपार हद्दीत रेतीची शोधाशोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 05:00 IST

सिहोरा परिसरातील वैनगंगा आणि बावनथडी नद्यांचे पात्रात रेतीचा विपुल साठा आहे. या रेतीला मोठी मागणी आहे. या नद्यांचे काठावर माफियांनी साम्राज्य उभारले आहे. बावनथडी नदीचे काठावर असणाºया वारपिंडकेपार गावाचे हद्दीत दर्जेदार विपुल रेतीचा साठा असताना माफियांनी बेधडक उपसा केल्याने गावाचे हद्दीतील नदी पात्रात रेती नाही.

ठळक मुद्देमाफियांनी केला रेतीचा उपसा : गावकऱ्यांची सोंड्या येथे धाव

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : बावनथडी नदी काठावर असणाऱ्या वारपिंडकेपार गावाच्या हद्दीत माफियांनी रेती चोरून नेल्याने गावकऱ्यांची शोधाशोध सुरू झाली आहे. गावाच्या सीमांकित क्षेत्रात केवळ माती शिल्लक आहे. यामुळे शासन माती लिलावात काढणार काय, असा सवाल गावकरी करीत आहेत.सिहोरा परिसरातील वैनगंगा आणि बावनथडी नद्यांचे पात्रात रेतीचा विपुल साठा आहे. या रेतीला मोठी मागणी आहे. या नद्यांचे काठावर माफियांनी साम्राज्य उभारले आहे. बावनथडी नदीचे काठावर असणाºया वारपिंडकेपार गावाचे हद्दीत दर्जेदार विपुल रेतीचा साठा असताना माफियांनी बेधडक उपसा केल्याने गावाचे हद्दीतील नदी पात्रात रेती नाही. या गावाचे सिमांकीत मातीचे ढिग आहेत. या गावाचे दुसºया टोकावर मध्यप्रदेशातील गावे आहेत. या राज्याचे सिमांकीत क्षेत्रात रेती उपसा करण्याकरिता गावकऱ्याना जाता येत नाहीत. गावात घरकुल, इमारत, शौचालय व अन्य बांधकाम करण्यासाठी रेतीची गरज असताना गावकऱ्याना नजिकच्या सोंड्या गावाचे हद्दीत सिमांकन क्षेत्रात जावे लागत आहे. शासन घाटांचे लिलाव करित असताना सिमांकन क्षेत्र घोषित करीत आहे. परंतु रेती माफिया घोषित क्षेत्राबाहेर रेतीचा उपसा करीत असल्याने गावकऱ्याना रेतीची टंचाई जाणवत आहे. माफिया सिमांकीत क्षेत्राबाहेर रेतीचा उपसा करित असल्याने दिसून आल्यानंतर कारवाई करण्यात येत नाही. या गावातील घाटांचे लिलाव सध्या झाले नाही. गावाचे हद्दीत असणाºया थोड्या फार रेतीचा उपसा माफियांनी सुरू केला आहे. मध्यप्रदेश राज्याचे सिमांकीत क्षेत्रातील रेतीचा उपसा माफिया करित आहेत. रेतीची चोरी व माफियावर अंकुश घालण्याचे विरोध अधिकार पोलिसांना देण्यात आल्यानंतर महसूल विभागाचे यंत्रणेने फिरकने बंद केल्याचे दिसून येत आहे. पोलिसांना विशेष अधिकार दिल्यानंतर ही रेती माफियावर अंकुश घालण्यात अपयश आले आहे. या अतिरिक्त जबाबदारीमुळे पोलिसांवर कामाचा वाढता व्याप आहे. अनेक तक्रारीचा तपास प्रभावित ठरत आहे. पोलिसाचे रिक्त जागा असल्याने माफियांना रानमोकळे ठरत आहे. सिहोरा परिसरात रेती माफियांना पोलीस आणि महसूल विभागाचा धाक नाही. नद्यांचे काठावरील गावात रेतीचे डम्पिंग दिसून येतील. पडद्यामागून कार्यकारण होत असल्याने रेतीचे माफिया खुलेआम नदीपात्रातून उपसा करित आहेत.वारपिंडकेपार गावात नदीचे पात्र असताना रेतीचे संकट माफियांनी निर्माण केले आहे. अन्य गावात भयावह स्थिती निर्माण होणार आहे. येत्या काही वर्षात नदीचे पात्रात रेती दिसणार नाही. काठावरील गावातील नागरिक अन्य गावातून रेतीची आयात करणार आहे. पोलीस, महसूल विभागाचे निष्काळजीपणामुळे गावकºयांना रेतीसाठी भटकंती करावी लागणार आहे. यामुळे आता गावातील घाटांचे लिलावात गावकरी विरोध करणार आहेत. सिमांकीत क्षेत्रात रेतीचा उपसा करण्यात येत नाही. माफिया सोबत यंत्रणेतील कर्मचाºयांचे साटेलोटे राहत असल्याने रेतीचा उपसा करण्यात येत आहे. यामुळे गावकरी संतप्त आहेत.बावनथडी नदीचे पात्रात रेतीची चोरी करण्यात येत असल्याने गावकऱ्याना रेतीची टंचाई जाणवणार आहे. प्रशासनाचे विरोधात गावात रोष आहे.-जितू पटले, सदस्य, ग्रामपंचायत वारपिंडकेपार.

टॅग्स :Socialसामाजिक