शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

ओबीसींच्या भूमिकेने उमेदवारांमध्ये अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात ओबीसी समाज आहे. बहुसंख्य असलेल्या या घटकाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला तर काय? असा प्रश्न आता या निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांपुढे निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेसाठी नामाप्र प्रवर्गातून १०७, तर पंचायत समितीसाठी २६४ उमेदवारांनी नामांकन दाखल केले हाेते. मात्र, ही निवडणूक स्थगित झाली. त्यामुळे आता ३९ जागांसाठी ३६१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात १९८ पुरुष आणि १६३ स्त्रियांचा समावेश आहे.

ज्ञानेश्वर मुंदेलाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नागरिकांचा मागासप्रवर्गातील जागांवर निवडणुकीला स्थगिती देताच ओबीसी संघटना आक्रमक झाल्या. निवडणुकीवर बहिष्काराची घाेषणा हाेऊ लागली. या घाेषणेमुळे निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यातच ही निवडणूक हाेणार की संपूर्ण निवडणुकीला स्थगिती मिळणार याबाबतही संभ्रम कायम आहे.भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ आणि पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी निवडणूक घाेषित झाली हाेती. विविध पक्षांसह इच्छुकांनी नामांकन दाखल केले. मात्र, नामांकन दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर राेजी सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालावरून राज्य निवडणूक आयाेगाने ओबीसी प्रवर्गातील निवडणुकीला स्थगिती दिली. त्यामुळे भंडारा जिल्हा परिषदेच्या १३ आणि पंचायत समितीच्या  २५ जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली. तसेच तीन नगर पंचायतींच्या १२ जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील ओबीसी संघटना आक्रमक झाल्या. आरक्षणच नाही तर मतदान नाही, अशी थेट भूमिका घेतली.भंडारा जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात ओबीसी समाज आहे. बहुसंख्य असलेल्या या घटकाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला तर काय? असा प्रश्न आता या निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांपुढे निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेसाठी नामाप्र प्रवर्गातून १०७, तर पंचायत समितीसाठी २६४ उमेदवारांनी नामांकन दाखल केले हाेते. मात्र, ही निवडणूक स्थगित झाली. त्यामुळे आता ३९ जागांसाठी ३६१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात १९८ पुरुष आणि १६३ स्त्रियांचा समावेश आहे. तसेच पंचायत समितीच्या ७९ जागांसाठी ५४४ उमेदवार रिंगणात आहेत. जवळपास ९०६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मात्र, या सर्वांमध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून अस्वस्थता पसरली आहे.आता निवडणूक हाेणार की रद्द हाेणार हाही संभ्रम उमेदवारात आहे. निवडणूक झाली आणि ओबीसी समाजातील मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला तर या निवडणूकीचे चित्र बदलण्याची शक्यता आहे. त्यातच निवडणूक झाली तरीही सत्ता स्थापन हाेण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण हाेवू शकते. त्यामुळे या उमेदवारांमध्ये अस्वस्थता दिसत आहे.

निवडणुकीतील रंगत संपली- ऐन भरात आलेल्या निवडणुकीची रंगत नागरिकांच्या मागासप्रवर्गातील जागांवरील निवडणूक स्थगित झाल्याने संपली आहे. निवडणुकी रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये संभ्रम आहे. निवडणूक रद्द झाली तर काय? असा प्रश्न अनेकांना सतावत आहे. ६ डिसेंबरपूर्वी जिल्ह्यात सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले हाेते. मात्र, आता केवळ निवडणूक स्थगित झाल्याच्या चर्चा दिसत आहेत. एकप्रकारे या निवडणुकीत सर्वांचा उत्साह गेल्याचे दिसत आहे.

१३ डिसेंबर राेजी   हाेणार चित्र स्पष्ट- ३९ गट व ७९ गणांसाठी निवडणूक हाेत असून या निवडणुकीसाठी उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तिथी १३ डिसेंबर आहे. त्यानंतरच या निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट हाेईल. त्यानंतरच चिन्ह वाटप हाेईल व प्रचाराला सुरुवात हाेईल. मात्र, प्रचारादरम्यान ओबीसीचा मुद्दा मात्र कायम राहील.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषदOBC Reservationओबीसी आरक्षण