शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

वंचित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार

By admin | Updated: April 1, 2015 00:36 IST

शिक्षण विभागाच्या बेफिकीर वृत्तीमुळे जिल्ह्यातील १०२ विद्यार्थ्यांना मागील चार वर्षापासून शिष्यवृत्ती प्राप्त झाली नाही.

राजू बांते  मोहाडीशिक्षण विभागाच्या बेफिकीर वृत्तीमुळे जिल्ह्यातील १०२ विद्यार्थ्यांना मागील चार वर्षापासून शिष्यवृत्ती प्राप्त झाली नाही. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय पुणे यांच्या पत्रान्वये वंचित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.पूर्व माध्यमिक व माध्यमिक परीक्षा २०१०, २०११, २०१२ व २०१३ या चार वर्षापर्यंत शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवंत ठरलेल्या जिल्ह्यातील १०२ विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती प्राप्त झाली नाही. त्यात माध्यमिक शाळा शिष्यवृत्तीमध्ये २०१० मध्ये भंडारा तालुक्यातील ५ विद्यार्थी, २०११ मध्ये ११, २०१२ मध्ये ५ व २०१३ मध्ये २८, लाखनी तालुक्यातील २०११ मध्ये एक विद्यार्थी, मोहाडी तालुक्यातील २०१३ मध्ये एक विद्यार्थी, साकोली तालुक्यातील २०११ मध्ये एक विद्यार्थी, मोहाडी तालुक्यातील २०१३ मध्ये एक विद्यार्थी, साकोली तालुक्यातील २०११ मध्ये एक विद्यार्थी व २०१३ या वर्षी २ विद्यार्थी तसेच तुमसर तालुक्यातील २०१० या वर्षी एक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिला आहे.पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेमधील भंडारा तालुक्यातील २०१० मध्ये ३, २०११ मध्ये ९, २०१२ मध्ये ६ व २०१३ म ध्ये ९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली नाही. लाखांदूर तालुक्यातील २०१० मध्ये ३, २०११ मध्ये २, २०१२ मध्ये १, मोहाडी तालुक्यातील २०१२ मध्ये १ विद्यार्थी, साकोली तालुक्यातील २०१० साली ४ विद्यार्थी तर तुमसर तालुक्यातील २०१० मध्ये १ व २०१२ मध्ये ३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पासून लांब राहावे लागले आहे. माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेतील जिल्ह्यातील ५९ व पूर्व माध्यमिक योजनेतील ४३ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्ती रक्कम जमा झाली नाही. चार वर्षापासून शिक्षण संचालनालयाला जाग आली आहे.शिक्षणाधिकारी भंडारा यांना शिक्षण संचालक, पुणे यांनी २७ मार्च रोजी पाठविलेल्या पत्रान्वये आता शिष्यवृत्ती प्राप्त न झालेल्या विद्यार्थ्यांची बँक खात्याची माहिती तात्काळ आॅनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर भरण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचा बँक खाते, पालकांचा आधार कार्ड याबाबत माहिती तात्काळ भरावयाची आहे. त्यामुळे चार वर्ष शिष्यवृत्तीची प्रतीक्षा करणारे जिल्ह्यातील १०२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. तसेच पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना २०१४-२०१५ च्या परीक्षेचा निकाल परिषदेने जाहीर केलेला आहे.