जांब /लोहारा : मोहाडी तालुक्यातील आंधळगाव ते धुसाळा हा रस्ता नागपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्याला जोडला जातो. या रस्त्याने दररोज असंख्य प्रवासी ये-जा करतात.
परंतु मागील ५ ते ६ वर्षांपासून या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हेच प्रवाश्यांना कळेनासे झाले आहे. आंधळगाव ते धुसाळा रस्ता चिखलमय बनल्याने जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार धुसाळा ग्रामवासीयांनी केली आहे. तरी याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन आंधळगाव ते धुसाळा रस्ता त्वरित दुरुस्तीची मागणी केली आहे. डांबरीकरणाची मागणी रोहित वणवे, अनिल भोयर, गणेश कोकाटे, किशोर शेंडे, संदीप बंड, विजय तितीरमारे, ईश्वर सेलोकर, श्याम कोसरे, कमलेश निमकर, संदेश सेलोकर, सुजित गजभिये, दीपम मते, प्रमोद कोसरे, श्याम चिचुलकर, पिंटू वडीचार, सारंग निशाणे, स्वप्नील सेलोकर, निकेश वणवे, सागर सिंगनजुडे यांच्यासह धुसाळा ग्रामवासी यांनी केली आहे. त्वरित या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा धुसाळा ग्रामवासीयांनी दिला आहे.