चांदपूर जलाशयाचे पाणी सोडण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 12:56 AM2019-08-07T00:56:25+5:302019-08-07T00:57:18+5:30

चांदपूर प्रकल्प लाभ क्षेत्रातील ८००० हे. शेतकरी सदर प्रकल्पामुळे सिंचनाखाली आली होती. अपुऱ्या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे धान पिकाची रोवणी पाण्याअभावी खोळंबली होती. परिणामी लाभक्षेत्र परिसरात शेतकरी चिंतातूर झालेला होता.

Directions to release water from Chandpur reservoir | चांदपूर जलाशयाचे पाणी सोडण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

चांदपूर जलाशयाचे पाणी सोडण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : चरण वाघमारेंनी घेतली आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : चांदपूर प्रकल्प लाभ क्षेत्रातील ८००० हे. शेतकरी सदर प्रकल्पामुळे सिंचनाखाली आली होती. अपुऱ्या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे धान पिकाची रोवणी पाण्याअभावी खोळंबली होती. परिणामी लाभक्षेत्र परिसरात शेतकरी चिंतातूर झालेला होता.
यावर आमदार चरण वाघमारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाण्याचा आढावा घेतला असून सद्यस्थितीत प्रकल्पामध्ये ३५ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. त्यामुळे १० टक्के पाणी म्हणजे ४ फुट पाणी सोडण्याचे निर्देश आमदार चरण वाघमारे यांनी संबंधित अधिकाºयांना दिले.
परिसरातील रोवणी न झालेल्या २००० हे. शेतीला लाभ पोहचणार असून त्यासंबंधात बैठक घेण्यात आलेली होती. या बैठकीत राजेश पटले तालुका अध्यक्ष भाजपा तुमसर, धनेंद्र तुरकर सभापती शिक्षण विभाग, जि.प. भंडारा, उप अभियंता हटवार, अभियंता मेहरत, बाबा तुरकर पिपरी प्रामुख्याने उपस्थित होते. कालपासून लोवरटॅक मध्ये पाणी सोडण्यात आलेले असून आजपासून पाणी सोडण्यात आला असल्याचे आमदार चरण वाघमारे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे कळविले आहे.

Web Title: Directions to release water from Chandpur reservoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.