शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

दिघोरी येथे १११ वर्षांपासून मारबतची परंपरा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 22:26 IST

भंडारा जिल्ह्यात प्रसिध्द असलेल्या दिघोरी (मोठी) येथील १११ वर्षांची परंपरा असलेला मार्बत उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘ईडा-पिडा टळो व बळीचे राज्य येवो’ च्या गजरात मार्बत काढण्यात आली. या उत्सवातून गावकऱ्यांनी सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविले. तर महिलांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

ठळक मुद्देसामाजिक एकोप्याचे दर्शन : ‘ईडा-पिडा टळो व बळीचे राज्य येवो’ च्या गजरात मार्बत उत्सव

मुकेश देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कदिघोरी (मोठी) : भंडारा जिल्ह्यात प्रसिध्द असलेल्या दिघोरी (मोठी) येथील १११ वर्षांची परंपरा असलेला मार्बत उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘ईडा-पिडा टळो व बळीचे राज्य येवो’ च्या गजरात मार्बत काढण्यात आली. या उत्सवातून गावकऱ्यांनी सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविले. तर महिलांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.दिघोरी येथे १९०७ साली मार्बत परंपरेला प्रारंभ झाला. तेव्हापासून अखंड ही परंपरा सुरु आहे. यावर्षी सोमवारी पाळव्यादिवशी सकाळी ८.३० वाजता शिव मंदिरात वॉर्डावॉर्डातून तयार झालेल्या मार्बत एकत्र आल्या. २१ मारबती गोळ्या झाल्यानंतर तंट्याभिल्ल व दांडपट्टा यांचे पुजन करण्यात आले. सरपंच अरुण गभणे व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुभाष हटवार यांच्या नेतृत्वात शिवमंदिरातून गावकऱ्यांच्या सहकार्याने मारबतची मिरवणूक काढण्यात आली. या उत्सवात पुरुषांसोबत महिलांही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मार्बत उत्सव हा केवळ पुरुषांनी साजरा करावा असा समज दिघोरीच्या महिलांनी गेल्या अनेक वर्षांपासून खोडा ठरविला आहे. गतवर्षी तर चक्क एका महिलेने चक्क मारबत हातात पकडून आम्हीही मागे नाही हे दाखवून दिले होते. यावर्षीही काही पुरुषांनी महिलांचे कपडे तर महिलांनी पुरुषांचे कपडे परिधान करुन नवीन प्रयोग अमलांत आणला. दिघोरीचा हा उत्सव बघण्यासाठी आसपासच्या गावातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरुणाईच्या थिरकण्याने या उत्सवात भर टाकली.यावर्षीच्या मारबतमध्ये गावातील भ्रष्टाचार, भ्रष्टाचारी नेते यासोबत निसर्गाचे रक्षण इत्यादी मुद्यांवर मारबत गाजली. नवनविन टायटलद्वारे गावकऱ्यांचे मनोरंजन झाले. शेवटी टी-पॉर्इंटवर नेवून मारबतीचे दहन करण्यात आले. ठाणेदार गावंडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कोणतीही अनुचित घटना न घडता मारबत उत्साहात काढण्यात आली. गावकºयांनी परंपरेची जोपासणा करीत मारबत काढली.