शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेत अडकलेली साडी रेशन कार्ड लाभार्थ्यांना मिळाली का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 15:40 IST

Bhandara : पुढील आठवड्यात रेशनच्या सर्व साड्यांचे वाटप होण्याची आहे शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकसभा निवडणुकीच्या आधी अंत्योदय रेशन कार्डधारकांना एक साडी भेट देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, आचारसंहिता लागू झाल्यानंतर हे वाटप थांबले होते. ते वाटप आता सुरू झाले असून, पुढील एक ते दोन आठवड्यांत सर्व साड्यांचे वाटप होईल, अशी शक्यता आहे.

राज्याच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ जाहीर करण्यात आले होते. या धोरणानुसार अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली प्रतिकुटुंब एका साडीचे मोफत वाटप करण्याची योजना सुरू केल्याची यापूर्वीच जाहीर झालेले आहे. या योजनेचा कालावधी २०२३ ते २०२८ असा पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आला आहे. ३१ डिसेंबर २०२२ पर्यंतच्या अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची संख्या ग्राह्य धरून हा निर्णय शासनाने घेतला होता. दरवर्षी अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाच्या संख्येत वाढ किंवा घट होत असते.

या योजनेसाठी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ, नवी मुंबई ही नोडल संस्था म्हणून नेमण्यात आली आहे. साड्यांचे वितरण राज्य शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत करण्यात येईल. दरम्यान, शासकीय गोदामात येणाऱ्या साठ्यांचे गड्ढे, तसेच रास्त भाव दुकानात पाठवण्यात येणाऱ्या साड्यांच्या गठ्यांची नोंद ऑनलाइन पद्धतीने ठेवणे आवश्यक आहे. साड्यांचे वाटप ई-पॉस मशीनद्वारेच करावे. साड्या वाटप करताना साड्या खराब होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, अशा विविध सूचना पुरवठा विभा

दरवर्षी मिळेल एक साडीसाड्यांचे वितरण राज्य शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत करण्यात येत आहे. सर्व लाभार्थ्यांना रास्त भाव दुकानांमधून साडी वितरित करण्यात येईल. राज्य शासनाने दुकानाम निश्चित केलेल्या सणाच्या दिवशी अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रतिकुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत वाटप केली जाणार आहे.

अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रतिकुटुंब एक साडी मोफत वितरित करणार आहे. सदर साड्यांचा पुरवठा हा प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी ते होळी २४ मार्च या कालावधीत करावयाचा होता. परंतु लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहितामुळे साड्यांचे वाटप शासन पत्रान्वये तात्पुरत्या स्वरूपात प्रलंबित ठेवण्यात आले होते. जूनपासून या साड्यांचे वितरण करण्याबाबत शासनाकडून मंजूर मिळाली असून साड्याचे वाटप सुरू आहे.- नरेश वंजारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, भंडारा.

६६,१०४ अंत्योदय कार्डधारकांना मिळणार लाभजिल्ह्यातील ६६१०४ अंत्योदय कार्डधारकांना या योजनेचा लाभ मिळणार असून, लवकरच उर्वरित साड्यांचे वाटप केले जाईल, असा विश्वास जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे. वाटपाला सध्या सुरुवात झाली असल्याचेही सांगण्यात आले.

४९,०५० साड्यांचे वाटप लोकसभेआधीजिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने ४९ हजार ५० लाभार्थी कुटुंबीयांस प्रतिकुटुंब एक साडी लोकसभाच्या आचारसंहितेपूर्वी वाटप करण्यात आले आहे. आता उर्वरित १७०५४ साड्यांचे वितरण लवकरच पूर्ण होणार आहे.

आचारसंहितेमुळे १७ लाख साड्यांचे वाटप लटकलेराज्य शासनाकडून लाभार्थ्यांना साड्यांचे वाटप केले जाणार होते; परंतु लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता मार्च महिन्यात लागल्यामुळे साड्या वाटप थांबविण्यात आले आहे. जून महिन्यात साड्यांचे वाटप सुरू झाले असून, पुढील आठवड्यात सर्व साड्यांचे वाटप होण्याची शक्यता आहे.लोकसभा आचारसंहितेमुळे १७ लाख शाळांचे वितरण लटकले होते. आचारसंहिता संपल्यानंतर शासन आदेशानुसार शाळांचे वाटप पॉश मशिनवर थम्प केल्यानंतर देण्यात यावे, असे आदेश मिळाले. त्यानंतर जिल्हा पुरवठा विभागातर्फे उर्वरित साड्यांचे वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 

टॅग्स :bhandara-acभंडारा