या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम राबविण्यासाठी जिल्हास्तरीय सुकाणू समितीची सभा पार पडली. या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. प्रशांत उईके, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.रियाज फारुकी, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मनोहर बारस्कर, आयएपीचे अध्यक्ष डाॅ.अशोक ब्राह्मणकर, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डाॅ. माधुरी माथूरकर, जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते याशिवाय महिला बालकल्याण विभाग पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी चंद्रमणी मेश्राम, जिल्हा समूह संघटक चंद्रकुमार बारई उपस्थित होते. विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्याचे उद्देश याबाबत माहिती देण्यात आली. यात पालक आणि काळजी वाहकांमध्ये अतिसार तसेच कोविड-१९ आजाराच्या प्रतिबंधक आणि व्यवस्थापनविषयक माहिती देण्यात आली. बालकांमध्ये ओआरएस आणि झिंकच्या वापराबाबतचे प्रमाण जास्त होईल याची सुनिश्चिती करणे, जनजागृती करणे, अतिसारामध्ये घ्यावयाची काळजी, ओआरएस व झिंक गोळ्या याचा वापर कसा करायचा, गोळ्यांचे घरोघरी वाटप आदींबाबतही माहिती देण्यात आली. पंधरवडा अंतर्गत मोहीम यशस्वी करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले.
जिल्ह्यात अतिसार नियंत्रण पंधरवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST