शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

धानाला बाेनस नाकारला, आता ‘डीबीटी’ कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2022 05:00 IST

आधारभूत खरेदी याेजनेच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यात ३८ लाख सहा हजार ७०३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. एक लाख ३० हजार शेतकऱ्यांनी आपला धान विकला. हमीभावानुसार शेतकऱ्यांना प्रती क्विंटल १९४० रुपये दिले जात आहे. २०१५-१६ पासून शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून बाेनस दिला जाताे. गतवर्षी ७०० रुपये बाेनस देण्यात आला हाेता. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांना बाेनस मिळेल अशी अपेक्षा हाेती. परंतु आता राज्य शासनाने बाेनस नाकारला.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य सरकारने बाेनस नाकारून धान उत्पादक शेतकऱ्यांच्या ताेंडाला पाने पुसली असून, बाेनसऐवजी आता डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) अंतर्गत निधी देण्याची तयारी चालविली आहे. मात्र अद्यापही डीबीटीच्या माध्यमातून नेमकी किती रक्कम शेतकऱ्यांना मिळणार याबाबत स्पष्ट नाही. बाेनसच्या धर्तीवर डीबीटी रक्कम द्यावयाची झाल्यास एकट्या भंडारा जिल्ह्यासाठी २७५ काेटी रुपयांची आवश्यकता आहे.आधारभूत खरेदी याेजनेच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यात ३८ लाख सहा हजार ७०३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. एक लाख ३० हजार शेतकऱ्यांनी आपला धान विकला. हमीभावानुसार शेतकऱ्यांना प्रती क्विंटल १९४० रुपये दिले जात आहे. २०१५-१६ पासून शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून बाेनस दिला जाताे. गतवर्षी ७०० रुपये बाेनस देण्यात आला हाेता. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांना बाेनस मिळेल अशी अपेक्षा हाेती. परंतु आता राज्य शासनाने बाेनस नाकारला. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. पूर्व विदर्भात ठिकठिकाणी बाेनससाठी शेतकरी रस्त्यावर उतरत आहे. भंडारा येथे ही भाजप किसान आघाडीच्या वतीने आंदाेलन करण्यात आले.बाेनसऐवजी शेतकऱ्यांना डीबीटी अंतर्गत लाभ देण्याच्या हालचाली आहेत. मात्र नेमका किती निधी शेतकऱ्यांना मिळणार हे मात्र अद्याप ठरले नाही. परंतु गतवर्षी दिलेल्या बाेनसप्रमाणे ७०० रुपये प्रति क्विंटल डीबीटी केल्यास भंडारा जिल्ह्यासाठी जवळपास २७५ काेटी रुपयांची आवश्यकता आहे. परंतु याबाबत अद्याप शासनाच्या वतीने काेणतेही नियाेजन दिसत नाही.

धान शेती नेणार कर्जाच्या खाईत...- निसर्गाची अवकृपा आणि महागाई यामुळे उत्पादन आणि लागवड खर्च याचा ताळमेळ लागत नाही. बियाणे, खत, औषधी, मजुरी आदींच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. मात्र शासन हमीभावानुसार १९४० रुपये दर देत आहे. हा दर शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत नेणारा आहे. बाेनसमुळे शेतकऱ्यांना कसातरी आधार मिळत हाेता. परंतु आता बाेनस नाकारून शासनाने शेतकऱ्यांना देशाेधडीला लावण्याचा प्रयत्न चालविल्याचा आराेप हाेत आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना बाेनस देण्यास नकार दिला आहे. डीबीटी देण्याची भाषा केली जात आहे. परंतु डीबीटीबाबत काेणतेही धाेरण अद्याप ठरलेले नाही. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या धानाच्या चुकाऱ्यासह डीबीटीची रक्कम तत्काळ द्यावी अन्यथा आम्ही आंदाेलन करू.- शिशुपाल पटले, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप किसान माेर्चा

 

टॅग्स :Farmerशेतकरी