शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक बँक अभियंत्यांकडून देव्हाडी उड्डाणपुलाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 22:50 IST

देव्हाडी उड्डाणपुलाच्या पोचमार्गावर पावसामुळे खड्डे पडले आहेत. उड्डाणपुलाच्या सिमेंट कांक्रीट पॅनेल्सच्या जोडमधून राख सातत्याने निघत आहे. याप्रकरणी ‘लोकमत’ने २९ जुलै रोजी ‘पावसानंतर उड्डाणपुलातून वाहू लागली राख’ असे वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत जागतिक बँक प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता व पथकाने पाहणी करुन जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला.

ठळक मुद्देअहवाल सादर : राख निघण्याच्या कारणांचा शोध घेण्याचे निर्देश

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देव्हाडी उड्डाणपुलाच्या पोचमार्गावर पावसामुळे खड्डे पडले आहेत. उड्डाणपुलाच्या सिमेंट कांक्रीट पॅनेल्सच्या जोडमधून राख सातत्याने निघत आहे. याप्रकरणी ‘लोकमत’ने २९ जुलै रोजी ‘पावसानंतर उड्डाणपुलातून वाहू लागली राख’ असे वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत जागतिक बँक प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता व पथकाने पाहणी करुन जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला.रामटेक - तुमसर - तिरोडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २४९ वर रेल्वे क्रॉसींग १३५ वर देव्हाडी येथे उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. मागील पाच वर्षापासून भरावात राख घालण्यात आली. पावसात भरावातील राख सिमेंटच्या दगडातून पोचमार्गावर वाहत आहे. राख वाहून जात असल्याने पोचमार्गावर भगदाड व खड्डे पडणे सुरु झाले आहे. उद्घाटनापुर्वीच उड्डाणपुलावरील भगदाड व खड्यांमुळे बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अपघाताला आमंत्रण देणारा हा मार्ग अशी त्याची ओळख निर्माण होत आहे.शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. त्या अनुषंगाने नागपूरचे कार्यकारी अभियंता बांधवकर, सहाय्यक अभियंता नागवडे, शाखा अभियंता पिपरेवार यांनी पुलाची केली. यावेळी देव्हाडीच्या सरपंच रिता मसरके, खुशाल नागपूरे आदींनी राखेबाबत प्रश्न उपस्थित केले.जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेटदेव्हाडी येथील उड्डाणपूलाच्या प्रकरणी कार्यकारी अभियंता बांधवकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांची भेट घेऊन चर्चा केली. तथा वाहणाऱ्या राख व पुलावरील खड्याबाबत अहवाल सादर केला. त्यात पोचमार्गावरील पडणाऱ्या खड्याचे वेळोवेळी निरीक्षण करुन त्यामध्ये सुधारणा करण्यात येईल व पोचमार्ग सुस्थितीत राहील याची दक्षता घेण्यात येईल असे आश्वस्त करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी गीते यांनी पुलावर पडलेले खड्डे दुरुस्ती करण्यासाठी तसेच खड्डे पडल्याचे व सिमेंट काँक्रीट पॅनलच्या जोडमधून राख निघत असल्याचे कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याचा सुचना केल्या आहे. सदर सुचनांचे पालन करण्याची ग्वाही कार्यकारी अभियंता बांधवकर यांनी दिली.पालकमंत्र्यांशी चर्चाभंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी चार दिवसांपूर्वी बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी देव्हाडी उड्डाणपूलाबाबत चर्चा केली आहे. राख वाहून जाणे व पूलावर भगदाड पडणे ही गंभीर बाब असून तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश डॉ. परिणय फुके यांनी दिले.देव्हाडी उड्डाणपूलावर भगदाड पडणे व सतत राख वाहून गेल्याने तो पोकळ झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. केवळ भगदाड भरणे व ग्राऊंडीग करुन राख वाहून जाऊ न देणे ही कायमस्वरुपी उपाययोजना नाही. संपूर्ण पूलातून आजही राख वाहत आहे. येथे तज्ञांकडून निरीक्षण करुन उड्डाणपूलाची चौकशी करण्यात यावी, पुलावरुन वाहतुक सुरु झाल्यानंतर अपघात घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील.- डॉ. पंकज कारेमोरेकाँग्रेस नेते, तुमसर