शहरं
Join us  
Trending Stories
1
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
2
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
3
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
4
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
5
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
6
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
7
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
8
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
9
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
10
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
11
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
12
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
13
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
14
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
15
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
16
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
17
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
18
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
19
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
20
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात

क्रीडा शिबिरामुळे बालकांच्या बुद्धीचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2016 00:35 IST

जर बालकाच्या बुद्धीचा विकास करावयाचा असेल तर त्याच्या शरीराचा अगोदर विकास होणे आवश्यक आहे.

साकोली : जर बालकाच्या बुद्धीचा विकास करावयाचा असेल तर त्याच्या शरीराचा अगोदर विकास होणे आवश्यक आहे. जर मुले निरोगी आणि आरोग्यदायी असतील तर त्यांचे मन लिहिण्या वाचण्यामध्ये योग्य प्रकारे लागेल. म्हणून सुदृढ शरीरामध्येच तल्लख बुद्धी वास करते व अशा क्रीडा शिबिरांमुळे बालकांच्या बुद्धीचा विकास निश्चितच होतो असे प्रतिपादन गोकुळ राऊत पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे साकोली यांनी जिल्हा क्रीडा कार्यालय भंडारा व तालुका क्रीडा संकुल साकोली तर्फे आयोजित ग्रीष्मकालीन क्रीडा शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाला केले.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून राजेशसिंह बैस तालुका होमगार्ड समादेशक शाहिद कुरैशी, गुणवंत क्रीडासंघटक, अरविंद पुस्तोडे मास्टर ट्रेनर, तुषार मेश्राम तालुका संयोजक यांच्या उपस्थितीत पार पडला. राजेश बैस यांनी सांगितले की, आजच्या कठीण जगामध्ये जगण्यासाठी हिमालयासारखी दृढता आणि परिस्थितीतला तोंड देण्यासाठी लोखंडाचे बळ आपल्यामध्ये असायला पाहिजे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा शरीर आरोग्य संपन्न असेल. क्रीडा संघटक कुरैशी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या ताणतणाव दूर करण्यासाठी अशा शिबिराची आवश्यकता आहे. शहरांमध्ये अमाप फी घेवून पालकांची लुबाडणूक केली जाते. ग्रामीण भागात क्रीडा शिबिरांचे आयोजन म्हणजे विद्यार्थ्यांसाठी मेजवाणीच असते. कावळे भरत यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले की, जवळपास १३५ विद्यार्थी सहभागी होते. शिबिरात कराटे, व्हॉलीबॉल, योगा, धनिर्विद्या, फुटबॉल, लंगडी, लगोरी, कटकवार विद्यालयात टेबलटेनिस, बास्केटबॉलचे मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी काजल भेंडारकर, आकांक्षा चव्हाण, छायांशू शिवणकर या शिबिरार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. क्रीडा प्रशिक्षक भरत कावळे, बी.के. दोनोडे, डी.एम. मानकर, एम.डी. घोरमारे, राजेश कापगते, उमेश चोले, पाखमोडे यांनी सहकार्य केले. संचालन बाळकृष्ण दोनोडे तर आभार एम.डी. घोरमारे यांनी मानले. शिबिर यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप इटणकर तालुका क्रीडा अधिकारी ए.बी. मरसकोल्हे यांनी सर्वांचे कौतूक केले. (तालुका प्रतिनिधी)