शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्राचीन बौद्धस्तुपांचा विकास रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 21:57 IST

प्राचीन व ऐतिहासिक शहराच्या आजूबाजूला करण्यात आलेल्या उत्खननात प्राचीन बौद्धकालीन वस्तू व ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे बौद्धस्तूप आढळून आहेत.

ठळक मुद्देदुर्लक्षित : वस्तू संग्रहालय पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : प्राचीन व ऐतिहासिक शहराच्या आजूबाजूला करण्यात आलेल्या उत्खननात प्राचीन बौद्धकालीन वस्तू व ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे बौद्धस्तूप आढळून आहेत. पवनी शहर हे पूर्वी बौद्ध धर्माचे मोठे केंद्र असल्याचे मानले जाते. या बौद्धस्तुपाचा बुद्धगया, सारनाथ आदीच्या धर्तीवर पर्यटनदृष्ट्या विकास केल्यास पवनी शहराचे आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव येवून पर्यटनाची नवी दालने उघडली जातील, यात शंका नाही.पर्यटनाशी संबंधित नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. शहर व तालुक्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत. येथे येणाऱ्या पर्यटनाच्या संख्येत मागील दोन वर्षात वेगाने वाढ झाली आहे. त्यामुळे पर्यटक वाढण्याकरिता व पर्यटनस्थळांचा विकास करण्याकरिता शासनस्तरावर नियोजन झाल्यास पर्यटनदृष्ट्या पवनी शहराचा विकास व्हायला वेळ लागणार नाही.शहरात होत असलेल्या खोदकामात अजूनही प्राचीन वस्तू सापडत आहेत. उत्खननात बुद्धकालीन वस्तू स्तूप सापडले आहेत. शहराजवळ जगन्नाथ टेकडी, चांडकापूर टेकडी, हरदोलाल टेकडी येथे पुराततत्व विभाग व नागपूर विद्यापीठाने ४४ वर्षापूर्वी केलेल्या उत्खननात तीन बौद्धस्तुप मिळाले आहेत. तसेच मोठ्या संख्येने बौद्ध कालीन वस्तू मिळाल्या आहेत. त्यामुळे येथे प्राचीन काळी बौद्ध धर्माचे फार मोठे केंद्र असल्याचे मानले गेले आहे.पवनी येथील उत्खननात सापडलेल्या अनेक मूर्ती वस्तू आजही मुंबई, दिल्ली, गया आदी शहरातील प्राचीन वस्तू संग्रहालयात आहेत. या वस्तू पवनीच्या प्राचीनतेची ओळख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देत आहेत. शहराजवळ मिळालेल्या प्राचीन बौद्ध स्तुपाचा पुरातत्व व पर्यटन विभागाने विकास केल्यास पर्यटनदृष्ट्या व बौद्ध धर्माच्या दृष्ट्या पवनी शहर हे आंतरराष्ट्रीय स्तरावर येण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल ठरणार आहे.यासोबतच येथे प्राचीन महत्वाचे पाऊल ठरणार आहे. यासोबतच येथे प्राचीन ऐतिहासीक वस्तूंचे वस्तू संग्रहालय होण्याची आवश्यकता आहैे. हे वस्तू संग्रहालय पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे आहे.येथे पर्यटन वाढण्याकरिता भरपूर वाव आहे. येणाºया दिवसात पर्यटन झपाट्याने वाढणार असल्याने त्या दृष्टीने आता पासूनच नियोजन करण्याची गरज आहे. पर्यटनदृष्ट्या शहराचा विकास झाला तर पवनी तालुक्याला 'अच्छे दिन' यायला वेळ लागणार नाही.