शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

आंगणवाडी सेविकांचा ‘डेप्युटी सीईओं’ना घेराव

By admin | Updated: July 31, 2016 00:16 IST

महिला व बालविकास कार्यालयाने अंगणवाडी केंद्रांसाठी खरेदी केलेले कपाट निकृष्ट दर्जाचे आहे.

कपाट खरेदी व थकीत मानधन प्रकरण : चौकशी समिती नेमली, अहवालानंतर कारवाईचे दिले आश्वासनभंडारा : महिला व बालविकास कार्यालयाने अंगणवाडी केंद्रांसाठी खरेदी केलेले कपाट निकृष्ट दर्जाचे आहे. यात मोठ्या प्रमाणात अपहार केला असून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नियमित मानधन मिळत नाही. या प्रमुख मागण्यांना घेऊन आज शनिवारला अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) पी. डी. राठोड यांना पाच तास घेराव घालून धारेवर धरले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ३०० अंगणवाड्यांमधून अंगणवाडी सेविका व मदतनीस बालकांना घडवित आहेत. मात्र, शासनाकडून त्यांना नियमित मानधन देण्यात येत नाही. त्यातच या महिन्यात महिला व बालविकास विभागाने जिल्ह्यातील ८९९ अंगणवाडी केंद्रांसाठी लोखंडी कपाट खरेदी केले. व ते परस्पर सर्व अंगणवाडी केंद्रांना पुरवठा केला. कपाटाची कुठलिही कल्पना सेविका व मदतनीस यांना नव्हती. सदर कपाट निकृष्ठ दर्जाच्या लोखंडी पत्र्याने तयार करण्यात आलेली आहे. सदर कपाट अंगणवाडी सेविकांनी खरेदी केल्याचे लिहून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी दबावतंत्राचा वापर सुरू केला होता. त्यामुळे हे कपाट भंगारावस्थेतील साहित्याने बनविल्याने त्यावर करण्यात आलेला लाखोंचा पैसा काही दिवसातच व्यर्थ जाणार आहे. परंतु कपाट खरेदी करताना अधिकाऱ्यांनी अपहार केला. मात्र त्याचे खापर सेविकांवर फोडण्याचा प्रकार भविष्यात झाला असता. त्यामुळे सेविकांमध्ये अधिकाऱ्यांच्या विरूध्द असंतोष पसरला आहे.कपाट बघितल्यावर त्याची किंमत दोन हजाराच्यावर नसतानाही सदर विभागाने त्यासाठी पाच हजार रूपये मोजल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी लावून धरली. याबाबत त्यांनी शनिवारला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) चे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे व जिल्हा कार्याध्यक्ष हिवराज उके यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष सविता लुटे, अल्का बोरकर, मंगला गजभिये, लहाना राजूरकर, रिता लोखंडे, सुनंदा चौधरी, सुषमा जांभुळकर, छाया क्षिरसागर, ललीता खंडाईत, छाया गजभिये आदींनी जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रेमसिंग राठोड यांना त्यांच्याच कक्षात घेराव घातला. यावेळी राठोड यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने महिलांनी रूद्रावतार दाखवित त्यांना या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. पाच तास हा घेराव घालण्यात आला. (शहर प्रतिनिधी)चौकशी समिती नेमलीप्रकल्प अधिकारी यांनी अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्या माध्यमातून ही कपाट खरेदी करून त्याता अपहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता चौकशी समिती नेमली व त्याचा अहवाल आठवडाभरात येईल. त्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन यावेळी संतप्त महिलांच्या शिष्टमंडळाला राठोड यांनी दिले. यानंतर सुमारे पाच तासानंतर हा घेराव मागे घेण्यात आला.पोलिसांचा चोख बंदोबस्तसंतप्त अंगणवाडी कर्मचारी कपाट खरेदी प्रकरणात जिल्हा परिषदमध्ये धडकणार असून कुठलातरी अनुचित प्रकार त्यांच्याकडून घडेल अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे भंडारा पोलिसांच्या महिला व पुरूष कर्मचाऱ्यांचे एक पथक तातडीने जिल्हा परिषदेत दाखल झाले. यावेळी जिल्हा परिषदेत प्रवेश करणाऱ्या सर्व प्रवेशद्वारावर व अधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.अशा आहेत मागण्याकपाट खरेदी प्रकरणात कारवाई, थकित मानधन त्वरीत देणे, भंडारा प्रकल्पातील सन २००९ पासूनचे केंद्र व राज्य सरकारचे थकित मानधन देण्यात यावे, २०१३ पासूनचा थकित प्रवासभत्ता त्वरीत देण्यात यावा, प्रत्येक अंगणवाडी केंद्रात बचत गटामार्फत आहार शिजवण्यात यावे, सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनिस यांना सेवासमाप्ती लाभ देण्यात यावा आदी मागण्यांचा यात समावेश आहे.