शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
2
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
3
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

बाद नोटा जमा करण्याकरिता बँकेत गर्दी

By admin | Updated: November 11, 2016 00:54 IST

५०० व एक हजारांच्या नोटा रद्द झाल्यानंतर आज गुरुवारी बँका सुरु झाल्या.

तुमसर : ५०० व एक हजारांच्या नोटा रद्द झाल्यानंतर आज गुरुवारी बँका सुरु झाल्या. तुमसर शहर व ग्रामीण परिसरात नागरिकांनी बँकेत तोबा गर्दी केली. बँकाबाहेरही मोठया रांगा होत्या. नोटा जमा करणे व काढणे हा क्रम सुरु होता. पेट्रोलपंप चालकांचा दोन दिवसांपासून व्यवसाय तेजीत आहे. ५०० किंवा एक हजाराचे पेट्रोल, डिझेल भरा किंवा सुट्टे रुपये द्या असा पावित्रा त्यांनी घेतला. .बुधवारपासून ५०० व एक हजारांच्या नोटा चलनातून बाद झाल्याची घोषणा झाल्यानंतर गुरुवारी नोटा बदलविण्याकरिता नागरिकांनी सकाळपासूनच बँकेची वाट धरली. नोटा बँकेत जमा करणे व खर्चाकरिता काही रक्कम काढणे याकरिता सर्वत्र नागरिकांची धावपळ सुरु होती. पुरुषाबरोबर महिलांनी गर्दी केली होती. सर्व वर्दळ केवळ बँकेत व पेट्रोलपंपावर दिसून आली. ७२ तासानंतर शुक्रवारपर्यंत जून्या नोटा पेट्रोलपंपावर घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी जून्या नोटावरच पेट्रोल खरेदी करण्याचे ठरविल्याचे दिसून येत होते. तुमसरात औषध विक्री दुकानात मात्र गरजूंना जुन्या नोटा घेऊन येणाऱ्या ग्राहकांना औषध दिली जात आहे, हे विशेष. काही डॉक्टरांनी आपल्या खाजगी रुग्णालयात ५०० व एक हजारांच्या नोटा स्विकारल्या जाणार नाहीत अशा सूचना फलक लावले आहेत. काही औषध विक्री दुकानदारांनी उधारीवर औषध देणे सुरु केले. शनिवार व रविवारी बँका सुरु राहणार असल्याने काही जणांनी दोन ते तीन दिवसानंतर गर्दी कमी झाल्यावर नोटा जमा करण्याकरिता जाण्याचा निर्णय घेतला. मोबाईल रिचार्ज दुकानातही चिल्लरची मागणी करण्यात येत आहे. एसटीमधून प्रवास करतांनी सुटे रुपये द्या अशी मागणी सुरु आहे. ५०० चा नोट दिल्यावर चिल्लर द्यावी कशी असा प्रश्न वाहकांना भेडसावित आहे. अशीच स्थिती रेल्वेस्थानकावर दिसून येत आहे. ऐरवी १००, ५० रुपयांच्या नोटा व स्किारणारे सध्या १००, ५० च्या नोटांची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. एटीएमधारक शुक्रवारची प्रतिक्षा करीत आहेत. बँकेत रोख रक्कम जमा नसल्याने अनेक बँकानी प्रत्येकी दोन हजार रुपये दिले. दोन दिवसानंतर दहा हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे. गुरुवारी वाटप करण्यात आलेल्या सर्व नोटा १००, ५०, २० व १० च्या होत्या हे विशेष. अजूनपर्यंत तुमसर येथील बँकेत नविन ५०० व दोन हजारांच्या नोटा उपलब्ध नाहीत. काही राष्ट्रीयकृत बँकानी चार ते दहा हजार रुपये वाटप केले. (तालुका प्रतिनिधी )मोदी स्ट्राईकने व्यवहार प्रभावितपालांदूर : काल रात्रीला अचानक पंतप्रधान मोदी यांनी ५०० व एक हजार रूपयांच्या नोटा बंद केल्याने ग्रामीण भागात दैनंदिन व्यवहार प्रभावित झाले. आम आदमीला तात्पुरता का होईना पण झटका बसला. पानटपरी ते चावळीपर्यंत नोटांचीच चर्चा ऐकायला मिळत आहे. जुन्या नोटा चालविण्याचा प्रयत्न काहींनी केला पण मोजक्या व्यवहारात लहान व्यापाऱ्यांनी ते घेणे टाळले. काही ठिकाणी नोटांच्या पूर्ण किंमतीत वस्तू खरेदी करण्याच्या अटीवर व्यवहार करण्यात आला. नोटा बंदच्या निर्णयाने मोदी सरकार सामान्यातल्या सामान्य कुटूंबात पोहचले. निर्णय कितीही कठोर असला तरी काळा पैसा, भ्रष्टाचार रोखण्याकरिता हे धाडसी पाऊल ठरल्याची प्रतिक्रिया वर्तविली जात आहे. गरिबांनी घाबरुन जाण्याचे कारण नसल्याचे सरकारने आम जनतेला सांगितले आहे. जग कितीही बदलला, डिजीटल जरुर झाला तरीही ग्रामीण भाग आजही जुन्यालाच सोने मानत पैसा बँकेऐवजी घरीच ठेवतात हे पुन्हा एकदा पुढे आले आहे. बुधवारला बँका बंद असल्याने दिवसभर व्यवहार प्रभावित झाले. बँक आॅफ इंडियाच्या खातेदारांना सकाळसत्रात विड्राल न दिल्याने व्यवहारात लहान नोटांची टंचाई भासली. मध्यवर्ती बँक शाखा पालांदूर नी २ ते १० हजारापर्यंत रोख असे पर्यंत विड्राल दिले. ५००, १००० च्या नोटा स्विकारण्याकडे बँकांचा कल अधिक होता. नविन रोख न मिळाल्याने लहान नोटांच व्यवहारात नव्हत्या. यासंदर्भात बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक आशुतोष पांडे म्हणाले, प्रथमत: ५००, १००० च्या नोटा स्विकारणे सुरु आहे. विड्राल करीता तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने विड्राल देणे बंद आहे. ग्राहक आपल्या खात्यात रक्कम जमा करु शकतो. जमा करतेवेळी आधारकार्ड, पॅनकार्ड असने आवश्यक आहे. ग्राहकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. (वार्ताहर)पोलीस बंदोबस्तात बँकांचे व्यवहारजवाहरनगर : पाचशे व एक हजार रुपयांच्या चलनी नोटा रद्द केल्याच्या पार्श्वभुमीवर काल बँका बंद होत्या. आज बँका सुरु झाल्या. नोटा बदलीकरिता बँकामध्ये गर्दी वाढली. मोठया रक्कमाचे व नोकरदार वर्ग गर्दी पाहुन परतीचा प्रवास स्विकारला. बँक कर्मचारी व ग्राहक यांच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबादीत राहावी यासाठी पोलिस तयनात करण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांची गस्त लावली आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अलीकडे पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयांचे जनतेकडून स्वागत होत आहे. पाचशे व हजाराच्या नोटा बदली करीता बँके सकाळपासून गर्दी उसळी होती. भाजी विक्रेते फेरीवाले, ग्राहकाकडे सुटे पैस नसल्यामुळे फेरीवाले आल्या पावली परत जात होते. दुसरीकडे होवू घातलेल्या परिस्थीतीवर मात करण्यासाठी शासन प्रशासनाने नियोजन नसल्यामुळे ग्राहकांना बँक कर्मचाऱ्याविरुध्द अप्रत्यक्ष रोष व्यक्त होत आहे. परिणामी बँक कर्मचारी याप्रसंगी ग्राहकांच्या रोषाप्रती पिसले जात असल्याचे चित्र निर्माण होत आहे.बँकाकडे दहा, विस, पन्नास व शंभरची चलती नोट कमी असल्यामुळे सर्व ग्राहकांना समान करण्यास अडचण जात आहे. परिणामी व्यवहार प्रसंगी हमरी-तुमरी वर प्रकरण घडत आहे. दरम्यान पोलीसांचा बँकामध्ये बंदोबस्त लावण्यात आलेले आहे. मोठया रक्कम घेवून येणारे म्हणजे एक लक्ष रुपयाचे वरील ग्राहकांना नोटाचे विवरण देणे जिकरीचे जात असल्याने आल्या पावली परत जातांना दिसत आहे. (वार्ताहर)