शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

दोन वर्षांत डेंग्यूने सहा जणांचा मृत्यू

By admin | Updated: May 16, 2016 00:41 IST

डासांपासून होणाऱ्या ‘डेंग्यू’ या जीवघेणा आजाराचा मागील दोन वर्षांत १२ वेळा उद्रेक झाला. यात सहा जणांचा मृत्यू झाला होता.

राष्ट्रीय डेंग्यू नियंत्रण दिवस आज : केंद्र सरकारच्या निर्देशानंतर आरोग्य विभाग करणार जिल्ह्यात जनजागृतीभंडारा : डासांपासून होणाऱ्या ‘डेंग्यू’ या जीवघेणा आजाराचा मागील दोन वर्षांत १२ वेळा उद्रेक झाला. यात सहा जणांचा मृत्यू झाला होता. आता या आजाराला रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानंतर भंडारा जिल्हा आरोग्य विभागाने धोरणात्मक कार्यक्रम हाती घेतला आहे.केंद्र सरकारच्या कीड नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत संवेदनशील गावात जनजागृतीसाठी प्रभावी योजना आखण्यात आली आहे. त्याअनुषंगाने १६ मेपासून राष्ट्रीय डेंग्यू नियंत्रण दिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात जनजागृती रॅली आयोजित करणे आणि डास निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. ग्रामपंचायती करणार धूरफवारणी ग्रामपंचायतींना त्यांना मिळणाऱ्या निधीतून धूर फवारणी मशिन खरेदी करणे आणि त्याचा नियमित उपयोग करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य सेवा विभागाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी डेंग्यू या आजाराचा उद्रेक होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी निर्देश दिले आहे. याशिवाय संवेदनशील भागात डेंग्यू नियंत्रणासाठी लोकसहभागातून जनजागृती हे प्रभावी असून जिल्ह्यात या आजारांमुळे ३६ गावे संवेदनशील आहेत. या गावात सरपंच, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. या अभियानात डेंग्यूपासून बचाव करणे, डासांची पैदास रोखणे, कोरडा आठवडा पाळणे व डासांपासून आजार रोखण्यावर भर दिला जात असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डोईफोडे यांनी सांगितले.वर्षभरात सुक्ष्म नियोजन डेंग्यू या आजारावर नियंत्रणासाठी जानेवारी ते डिसेंबरपर्यंत सुक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यात आला आहे. यात डेंग्यूशिवाय डास व किटकापासून होणारे हिवताप, मेंदूज्वर, चंडीपुरा, चिकनगुनिया या आजाराच्या निर्मूलनासाठी आरोग्य केंद्राच्यास्तरावर कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. केंद्र सरकारने ‘इंडिया फाईट्स डेंग्यू’ अ‍ॅप सुरू केले आहे. त्या धर्तीवर भंडारा आरोग्य विभागाने ‘एनव्हीबीडीसीपी’ या नावाने ग्रुप बनविला आहे. त्या माध्यमातून या आजार निर्मूलनाची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आर. डी. झलके यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)जिल्ह्यात १२ वेळा झाला होता उद्रेक डासांपासून होणारा ‘डेंग्यू’ हा जीवघेणा आजार आहे. मागील दोन वर्षात या आजाराचा १२ वेळा उद्रेक झाला. यात सहा जणांचा जीव गेला. २०१४-१५ या वर्षात डेंग्यूचा ११ ठिकाणी उद्रेक झाला. त्यावेळी मोठ्या प्रमाणात रूग्णांची संख्या वाढली होती. त्यावेळी ५५५ रूग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ६५ रूग्णांमध्ये डेंग्यूची लक्षणे आढळून आली होती. त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला होता. डेंग्यू या जीवघेण्या आजाराची भयावहता लक्षात घेता जिल्ह्यातील संवेदशील ३६ गावात डेंग्यू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात आला. सन २०१५-१६ या वर्षात डेंग्यूचा केवळ एक उद्रेक नोंद करण्यात आला. यावेळी २३ जणांचे रक्तनमुने तपासणीठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी चार रूग्णांमध्ये डेंग्यूची लक्षणे आढळून आली होती. या वर्षात आतापर्यंत जिल्ह्यात डेंग्यूचा उद्रेक झाला नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.