शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

राजपत्रित अधिकाऱ्यांचे जिल्हा परिषदेत निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 9:54 PM

सेवांतर्गत वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी ५० टक्के पदव्युत्तर शिक्षणाचा जागा राखीव ठेवण्यासह अन्य मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट संघटनेच्यावतीने शुक्रवारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून निदर्शने केली.

आॅनलाईन लोकमतभंडारा : सेवांतर्गत वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी ५० टक्के पदव्युत्तर शिक्षणाचा जागा राखीव ठेवण्यासह अन्य मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट संघटनेच्यावतीने शुक्रवारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून निदर्शने केली.वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदव्युत्तर शिक्षणाचा पुर्वीप्रमाणे ५० टक्के कोटा देण्यात यावा, यापुर्वीही असा कोटा देण्यात येत होता. त्यामुळे विविध रुग्णालयात रुग्णांना सेवा देण्यासाठी तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध व्हायचे. भारतीय आर्युविद्यान परिषद नियमांतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांना ५० टक्के पदव्युत्तर पदविका देण्यात येत आहे. त्यामुळे हा निर्णय पुर्वीप्रमाणे करण्यात यावा, अशी मागणी आहे. महाराष्ट्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना केंद्र शासन व इतर राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते देण्यात यावे, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत कठोर पावले उचलण्यात यावी या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून निदर्शने केली.यावेळी जिल्हा परिषदेत मधुकर कुंभरे, डॉ. राकेश नंदेश्वर, डॉ. विकास मेश्राम, डॉ. शंकर कैकाडे, डॉ. सविता मालडोंगरे, डॉ. ज्योती कुकडे, डॉ. नरेंद्र नौकरकर, डॉ. ताराचंद येळणे, डॉ. मेहबूब कुरैशी यासह अन्य पदाधिकारी सहभागी होते.