शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलाचा मार्ग मोकळा करून अतिक्रमणधारकांना पट्टे देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:50 IST

Bhandara : 'सर्वांसाठी घरे' धोरणाला चालना देण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : साकोली नगर परिषद हद्दीतील शासकीय जमिनीवर २०११ पूर्वीपासून राहणाऱ्या नागरिकांना कायदेशीर हक्काने मालकी पट्टे द्यावेत, अशी मागणी माजी नगरसेवक रवी परशुरामकर यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांच्याकडे केली आहे. 'सर्वासाठी घरे-२०२२' या केंद्र शासनाच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी नगरपरिषद क्षेत्रातील सर्व पात्र अतिक्रमणधारकांना तातडीने पट्टे देण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.

माजी शहराध्यक्ष व्यंकटेश येवले, माजी नगरसेवक मनीष कापगते, नितीन खेडीकर, जिल्हा सचिव किशोर पोगळे यांनीही सातत्याने या मागणीसाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. महाराष्ट्र शासनाच्या १७ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या आणि २६ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या सुधारित शासन निर्णयानुसार, २०११पूर्वीपासून महसूल विभागाच्या शासकीय जमिनीवर वास्तव्यास असलेले नागरिक पात्र असून, त्यांना मालकी हक्काचे पट्टे दिले जाऊ शकतात.

नगरपरिषद, साकोलीने याआधी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ३८९ लाभार्थ्यांची यादी भूमी अभिलेख कार्यालयाकडे सादर केली होती. त्यातील ५६ लाभार्थ्यांची मोजणी पूर्ण होऊन त्यांना पट्टे वाटप झाले आहेत. मात्र, उर्वरित श्रीनगर कॉलनी, बिरसा मुंडा चौक, गजानन बाबा टोली, गोपाळ टोळी, पंचशील वॉर्ड, आमराई, तलावावार्ड, शिवाजी वॉर्ड, गोबाळे यांच्या घराजवळील आणि इतर प्रभाग क्रमांक १ ते १०मधील नागरिक अजूनही प्रतीक्षेत आहेत.

या सर्व प्रभागांतील फेरमोजणी तातडीने करून पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप करावेत, जेणेकरून प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेणे त्यांना शक्य होईल, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते महादेव कापगते, अरुण बडोले, पंकज मुंगूसमारे, चंदू कापगते, मेघा बडवाईक, पी. एम. कोटांगले, हिना राऊत आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :bhandara-acभंडारा