लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : गत सात ते आठ वर्षापासून रखडलेला साकोली तालुक्यातील भेल प्रकल्प तातडीने सुरू करण्यात यावा, अशी मागणी माजी खासदार शिशुपाल पटले यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देवून पटले यांनी मुख्यमंत्र्यासोबत चर्चा केली.जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे. २०१२ मध्ये जमिन अधिग्रहण करून प्रकल्पाच्या कामाला सुरूवात झाली. आवारभिंत व लहानमोठी कार्यालये बांधून उभी आहेत. प्रत्यक्षात मात्र प्रकल्पाचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे रोजगार मिळेल या आशेवर असलेल्या परिसरातील तरूणांचा भ्रमनिराश झालेला आहे.आपल्या मुलांना नोकऱ्या मिळतील, या आशेने शेतकऱ्यांनी कोणतीही आडकाठी न घालता प्रकल्पाकरीता त्यांच्या शेतजमिनी उपलब्ध करून दिल्या. मात्र निधीअभावी हा प्रकल्प रखडला. या प्रकल्पाला केंद्र व राज्य सरकारने तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा आणि प्रकल्पाच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी शिशुपाल पटले यांनी केली आहे. याच विषयावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीसुध्दा माजी खासदार शिशुपाल पटले यांनी भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना याबाबत निर्देश दिले असल्याची माहिती शिशुपाल पटले यांनी दिली.
भेल कारखाना सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 21:51 IST
गत सात ते आठ वर्षापासून रखडलेला साकोली तालुक्यातील भेल प्रकल्प तातडीने सुरू करण्यात यावा, अशी मागणी माजी खासदार शिशुपाल पटले यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देवून पटले यांनी मुख्यमंत्र्यासोबत चर्चा केली.
भेल कारखाना सुरू करण्याची मागणी
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यासोबत चर्चा : शिशुपाल पटले यांच्या मागणीनंतर पालकमंत्र्यांना निर्देश