शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

२२५ रस्त्यांसाठी ४३ कोटींची मागणी, ० निधी : जिल्हा परिषदेंचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 14:35 IST

Bhandara : जि. प. रस्त्यांचे बेहाल, प्रस्तावाला सात महिने लोटले, अद्यापही निधी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत १२ वर्षांपासून जिल्हापरिषदेच्या रस्त्यांसाठी राज्य शासनाचा निधी प्राप्त झालेला नाही. परिणामी, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चार उपविभागांतील जिल्हा व ग्रामीण रस्त्यांवर ५३ अपघात प्रवण स्थळ (ब्लॅक स्पॉट) निर्माण झाले आहेत. 'ब्लॅक स्पॉट' व रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ८.१५ कोटींच्या निधीची गरज आहे. सात महिन्यांपूर्वी मागणीचे प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडे सादर झाले; परंतु अद्यापही निधी मिळालेला नाही, निधी मिळणार तरी केव्हा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील ग्रामीण मार्गाची व इतर जिल्हा मार्गाची दैन्यावस्था आहे. पावसाळ्यात ग्रामीणांना जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागतो. देखभाल व दुरुस्तीअभावी अनेकदा या रस्त्यांबर अपघात घडले आहेत. नागरिकांचे जीव गेले असून, कायमचे अपंगत्व आले आहे, जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना ग्रामीण तसेच इतर जिल्हा मार्गावरील अपघात प्रवण स्थळाची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने डिसेंबर २०२४ मध्ये सादर केली; परंतु सात महिन्यांचा कालावधी लोटूनही रुपया मिळाला नाही. रस्त्यांची दुरवस्था संपणार तरी कधी, असा प्रश्न आहे.

उपविभागनिहाय ब्लॅक स्पॉट संख्याउपविभाग          रस्त्यांची संख्या      अंदाजित खर्च (लाखात)भंडारा                    २१                             ३९५लाखांदूर                 ०७                             १००साकोली                 १९                              ३१०तुमसर                   ०६                              ९०एकूण                    ५३                              ८१५

२५३ रस्त्यांसाठी हवाय ४३ कोटींचा निधीअतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी दरवर्षी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनास प्रस्ताव सादर केले जातात. यंदाही २५३ रस्त्यांसाठी ४३ कोटींची मागणी करण्यात आली; परंतु निधी मिळत नसल्याची बाब जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी दोनदा उजागर केली आहे, हे येथे उल्लेखनीय.

टॅग्स :bhandara-acभंडाराroad safetyरस्ते सुरक्षा