लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : दरवर्षी कर्जात अडकणारा शेतकरी आत्महत्या करीत आहे. शेतकरी हिताच्या केवळ वल्गना केल्या जातात. शेती अधिक समृध्द करण्यासाठी शेतीकरिता बिनव्याजी कर्ज देण्यात यावे, यासह इतर मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य किसान सभा मोहाडीच्यावतीने तहसीलदार मोहाडी यांच्या मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.निवेदनात, सातबारा कोरा करा, शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी देण्यात यावी, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा आधारभूत भाव देण्यात यावे, शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कारागीर व असंघटीत कामगार यांना वयाचे ६० वर्षानंतर पेन्शन देण्याचा कायदा करुन दरमहा पाच हजार रुपये पेन्शन द्या, भूसंपादन कायदा २०१३ ची अंमलबजावणी करा, वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानीदाखल ३० हजार रुपये प्रतिएकर नुसकान भरपाई देण्यात यावी, शेतकºयांचे विज बिल माफ करुन शेतीला २४ तास विद्युत पुरवठा करा, कब्जा असलेल्या वन व महसुल जमिनी करणाºयांच्या नावावर करा, शेतीमध्ये गुंतवणूक वाढवा, दुधाला हमीभाव देण्यात यावे, गायीच्या दुधाला प्रतिलिटर ४० रुपये व मशीच्या दुधाला प्रति लिटर ५० रुपये भाव देण्यात यावे या मागणीचे निवेदन देण्यात आले.शिष्टमंडळात जिल्हा सचिव माधवराव बांते, तालुका सचिव नितीन मोहारे, जयप्रकाश मोहारे यांच्या नेतृत्वात जगदीश बिरणवार, राजू उपरकर, अनिल गाढवे, हेमराज बिरनवार, उमेश दमाहे, तोताराम नागपुरे, राकेश वहिले, मधुकर बुरडे, जयसिंग कस्तुरे आदींचा समावेश होता.
शेतीसाठी बिनव्याजी कर्ज देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 23:55 IST
दरवर्षी कर्जात अडकणारा शेतकरी आत्महत्या करीत आहे. शेतकरी हिताच्या केवळ वल्गना केल्या जातात. शेती अधिक समृध्द करण्यासाठी शेतीकरिता बिनव्याजी कर्ज देण्यात यावे, यासह इतर मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य किसान सभा मोहाडीच्यावतीने तहसीलदार .....
शेतीसाठी बिनव्याजी कर्ज देण्याची मागणी
ठळक मुद्देप्रधानमंत्री, मुख्यमंत्र्यांना किसान सभेचे निवेदन