शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
4
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
5
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
6
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
7
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
8
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
9
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
11
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
12
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
13
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
14
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
15
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
16
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
17
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
18
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
19
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी

मांग-गारुडी समाज दाखल्यांपासून वंचित

By admin | Updated: December 15, 2014 22:51 IST

तालुक्यातील गिरोला येथील वडार समाजाला व कारधा येथील मांग गारुडी समाजाला तत्काळ जातीचे दाखले देण्यात यावे अशी मागणी आदिवासी पारधी समाज परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

भंडारा : तालुक्यातील गिरोला येथील वडार समाजाला व कारधा येथील मांग गारुडी समाजाला तत्काळ जातीचे दाखले देण्यात यावे अशी मागणी आदिवासी पारधी समाज परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान या मागणीला घेऊन आज त्रिमूर्ती चौकात आंदोलन करण्यात आले. मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे पाठविण्यात आले आहे.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे गिरोला येथील वडार समाजाचे यशवंतराव चव्हाण वसाहतीअंतर्गत पुनर्वसन करण्यात यावे यासाठी वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. परिणामी पुनर्वसनाची प्रक्रियाही सुरु करण्यात आली. मात्र पुनर्वसनासाठी जातीच्या दाखल्याची गरज होती. जातीच्या दाखल्यासाठी वडार समाजाला व मांग गारुडी समाजाला सन १९६१ चा महाराष्ट्रातील वास्तव्याचा पुरावा मागितला जात आहे. मात्र हा समाज भटक्या विमुक्त समाजात मोडत असल्यामुळे ते कधीच एका ठिकाणी राहत नाहीत. गावात गेले तर घर नाही, रानात आले तर हातभर जमीन नाही. अशा स्थितीत त्यांनी वास्तव्याचा पुरावा आणावा तरी कुठून अशी स्थिती या समाजाची झाली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे लोटले तरीही या समाजाला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व अन्य संवैधानिक गरजांपासून दूर ठेवण्याचे षडयंत्र शासनाने केले आहेत. भंडारा जिल्ह्यात वडार, मांग गारुडी, पारधी अशा अनेक जाती शासनाच्या विकासात्मक धोरणापासून दूर आहेत. राजकीय इच्छाशक्तीअभावी या समाजाची प्रगती होऊ शकली नाही. परिणामी या समाजाला वेळोवेळी आंंदोलन करण्याची वेळ आली आहे. शासन निर्णयाप्रमाणे २००८ व २०१२ प्रमाणे वडार व मांग गारुडी समाजाला कोणत्याही अटी न घालता जातीचे दाखले देण्यात यावे, गिरोला येथील वडार समाजाच्या लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत पुन:वर्सन करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे. मागण्यांची पूर्तता न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलनाचा इशाराही फाउंडेशनच्या वतीने देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)