भंडारा : भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भुसंपादन कायदा रद्द करण्याबाबतचे निवेदन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले. या निवेदनामध्ये भूसंपादन कायदा रद्द करण्यात यावे, धानाला तीन हजार रूपये प्रति क्विंटल हमी भाव देण्यात यावा, अवेळी आलेल्या पावसामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टरी २५ हजार रूपये नुकसान भरपाईची मदत देण्यात यावी, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, ओबीसीची जनगणना जातनिहाय करावी. या बाबतच्या मागण्या करण्यात आल्या. मागण्या पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, प्रदेश उपाध्यक्ष मधुकर सांबारे, प्रदेश सचिव अविनाश ब्राम्हणकर, माजी मंत्री नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल, विलास काटेखाये, सचिदानंद फुलेकर, नरेंद्र झंझाड, वासू बांते, नरेश चुन्हे, डॉ. विकास गभणे, महेंद्र गडकरी, राजेश डोंगरे यांचा समावेश होता. यावेळी सुमेध श्यामकुंवर, किरण अतकरी, राजू माटे, अरुण गोंडाणे, ज्योति टेंभुर्णे, रामेश्वर चांदेवार, जगदिश निंबार्ते, महेश निंबार्ते, संजय भोयर, सुनिल मांगरे, प्रमिला साकुरे, माया अंबुले, आनंद बोदेले, विनोद भुते, ईश्वर कळंबे, दिपक चिमणकर, सुनिल टेंभुर्णे, विजय ईश्वरकर, होमदेव चकोले, चंद्रशेखर टेंभुर्णे, राजेश मेश्राम, मदन भुरले, आरजू मेश्राम, शिवदास चोपकर, अज्ञान राघोर्ते, दुर्गा हटवार, संध्या वासनिक, कमला मोथरकर, सुभाष तितिरमारे, बंडू शेंडे, विजय पारधी, रिता हलमारे, निलिमा गाढवे, केशव बांते, वामन शेंडे, रामरतन वैरागडे, डॉ. विजय ठक्कर, भगीरथ धोटे, दादाराम अतकरी, भगवान बोंद्रे, लक्ष्मण मेश्राम, धरम रामटेके, प्रकाश शेंडे, राजाराम बांते, निरू पेंदाम, जिजा निंबार्ते, सुनिता चोपकर, रसिका मोहतुरे, महिपाल ईश्वरकर, माया अंबुले यांनी सहभाग घेतला. (नगर प्रतिनिधी)
भूसंपादन कायदा रद्द करण्याची मागणी
By admin | Updated: March 20, 2015 00:40 IST