शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्याची मागणी

By admin | Updated: February 8, 2017 01:44 IST

शासकीय अन्नधान्य व केरोसीन लाभार्थी कार्डधारकांना न देता काळाबाजार करीत असण्याची तक्रार आंधळगाव येथील ग्रामस्थांनी केली असून

आंधळगाव : शासकीय अन्नधान्य व केरोसीन लाभार्थी कार्डधारकांना न देता काळाबाजार करीत असण्याची तक्रार आंधळगाव येथील ग्रामस्थांनी केली असून त्यांचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे. आंधळगाव येथील राशन दुकानदार शालीक डेकाटे हे अन्नधान्य व रॉकेलचा काळाबाजार करतात. राशन कार्डावर स्वत:च गॅस कनेक्शन असल्याचा शिक्का मारणे, कार्डावरुन नाव कमी करणे, कार्डधारकांसोबत उर्मट वागणे अशी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार दिली आहे. त्यांचा परवाना रद्द करुन चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मोहाडी तालुक्यात शालीक डेकाटे यांचे शासकीय स्वस्त धान्याची दुकान आहे. मात्र खऱ्या लाभार्थ्यांना अन्नधान्य व केरोसीन वितरण न करता त्याचा काळाबाजार केला जातो. कार्डधारकांना अन्नधान्य व केरोसीन दिले जात नाही. अनेकांकडे गॅस कनेक्शन नसूनही त्याच्या कार्डावर गॅस असल्याचा स्टॅप डेकाटे हेच मारतात. यामुळे खरे लाभार्थी शासकीय अन्नधान्यापासून वंचीत राहत आहे. शासनाने दिलेले अन्न धान्याचे वाटप आठ-दहा दिवसातच संपल्याचे सांगण्यात येते. उरलेले अन्नधान्य हे वाढीव दरात विकतात. कार्डधारकांना २ लीटर केरोसीन मिळत नाही. मात्र टॅक्टर मालकाना ३० रुपया भावात २५ ते ३० लीटरही मिळत असते. आंधळगाव येथील वॉर्ड क्र. ५ मधील संजय डहाके यांच्या कार्डवर डेकाअ‍े यांनी स्वत:च गॅस कनेक्शन असल्याचा स्टॅप मारला व धान्य व केरोसीन देणे बंद केले. यामुळे मागील सहा महिन्यापासून डहाके हे अन्नधान्य व केरोसीन पाहून वंचीत आहेत. याबाबत विचारणा केली असता डेकाटे हे धमकावितात. अशा मनमानी करणाऱ्या राशन दुकानदाराचा परवाना रद्द करुन चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)