शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
4
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
5
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
8
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
9
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
10
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
11
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
12
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
13
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
14
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
15
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
16
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
17
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
18
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
19
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
20
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

विकासकामे खोळंबण्याला पालकमंत्र्यांची दिरंगाई कारणीभूत

By admin | Updated: May 27, 2014 00:34 IST

यावर्षीच्या हंगामात अतवृष्टीने कहर केला. तत्कालीन केंद्रीय मंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागांचा दौरा केला. परंतु भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आले नाही. जो जनतेचे सुख दु:ख जाणत नाही,

भंडारा : यावर्षीच्या हंगामात अतवृष्टीने कहर केला. तत्कालीन केंद्रीय मंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागांचा दौरा केला. परंतु भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आले नाही. जो जनतेचे सुख दु:ख जाणत नाही, पालकत्वाची जबाबदारी सांभाळता येत नाही, अशांना पालकमंत्री पद देता तरी कशाला, असा घणाघाती आरोप आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आयोजित पत्रपरिषदेत केला. पत्रपरिषदेला हेमंत बांडेबुचे, सुनील कुरंजेकर, अनिल गायधने उपस्थित होते.

यावेळी ते म्हणाले, २८ नोव्हेंबर २0१0 मध्ये भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तेव्हापासून केवळ १७ भेटी त्यांनी दिल्या आहे. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहण समारंभाला ते आले नाहीत. याशिवाय मुख्यमंत्री किंवा त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षा जिल्ह्यात आले तरीही ते पालकमंत्री या नात्याने येत नाहीत, तरीसुद्धा त्यांच्या पक्षात ते पदावर कायम आहेत. ती त्यांच्या पक्षांतर्गत बाब असली तरी सामान्यांचे प्रश्न जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून मार्गी लागतात.

या समितीचे पालकमंत्री अध्यक्ष असतात. त्यांच्या न येण्यामुळे नियोजन समितीची सभा होत नाही. परिणामी कामे रेंगाळतात, असा आरोपही त्यांनी केला.

१३.९६ कोटी थकीत

पालकमंत्री रणजित कांबळे यांच्याकडे पाच विभागाची जबाबदारी आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाचे ते राज्यमंत्री आहेत. असे असताना जिल्ह्यात धान खरेदी केंद्र बंद आहेत. याबाबत पणन विभागाला विचारले तर ते अन्न पुरवठा विभागाकडे बोट दाखवितात.

अन्न पुरवठा विभागाला विचारले तर ते शासनाकडे बोट दाखवितात. जिल्ह्यात सरकारचे प्रतिनिधीच असताना सामान्य जनतेने कुणाकडे पाहायचे असा सवालही त्यांनी केला. ८ मे २0१४ रोजी रोजी नवीन शासन निर्णयात धान खरेदी केंद्र बंद करण्यात यावे, असे म्हटले आहे.

मुळात अधिकार्‍यांनी धान खरेदी केंद्र सुरुकेले नाहीत रत बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शासनाचे बोनस शेतकर्‍यांऐवजी व्यापार्‍यांना मिळत आहे. सन २0१३-१४ मध्ये ‘अ’ श्रेणी व साधारण धान ५,७७,९७0 क्विंटल खरेदी करण्यात आला. त्याची किंमत ९0 कोटी ९0 ला ९९,८२८ ईतकी होते. त्यातील १३ कोटी ९६ लाख रुपयांची शेतकर्‍यांची रक्कम थकीत आहे.

चार वर्षात एकदाही बैठक नाही

भंडारा जिल्ह्यात गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प आहे. बावनथडी प्रकल्पाचे पाणी शेतकर्‍यांना मिळाले नाही. तरीसुद्धा पालकमंत्र्यांनी चार वर्षात एकदाही या प्रकल्पाची माहिती जाणून घेण्यासाठी बैठक घेतली नाही.

१४ तासांचे भारनियमन

जिल्ह्यात ८३ फिडर आहेत. दररोज मोठय़ा प्रमाणात फिडरनिहाय भारनियमन सुरू आहे. कुठे तीन तास तर कुठे १२ तासांचे भारनियमन सुरु आहे. कृषी पंपाचे चार ते १४ तासांचे भारनियमन सुरू आहे. (जिल्हा प्रतिनिधी)