शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

पवनारखारीत राष्ट्रध्वजाचा अवमान

By admin | Updated: January 28, 2017 00:39 IST

प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण करताना राष्ट्रीय ध्वज खाली पडला. यामुळे उपस्थितांमध्ये खळबळ उडाली.

तुमसर : प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण करताना राष्ट्रीय ध्वज खाली पडला. यामुळे उपस्थितांमध्ये खळबळ उडाली. हा प्रकार पवनारखारी ग्रामपंचायतीत घडला. पोलीस पाटलांच्या तक्रारीवरून सरपंचावर गोबरवाही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रजासत्ताक दिनी पवनारखारी ग्रामपंचायतीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. ध्वजारोहनाला गावातील मान्यवर उपस्थित होते. सरपंच कविता बोमचोर यांचे हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम घेण्याचे ठरले होते. राष्ट्रीय तिरंगा ध्वज व जातांनी हातातून दोरी सुटल्याने क्षणात तिरंगा ध्वज खाली पडला. पोलीस पाटील राजेश गोयनका यांनी संबंधित तक्रार गोबरवाही पोलीस ठाण्यात दिली. गोबरवाही पोलिसांनी सरपंच कविता बोमचेर यांच्या विरोधात राष्ट्रध्वज अवमान कलम १९७१/२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी माजी सरपंच व विद्यमान सदस्य विलास उचिबगले, दिलीप उईके, रेणूका परबते, संगीता कुंभरे, आशिष कोकुडे यांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. राष्ट्रध्वज फडकविण्याची तयारी संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवकावर कर्मचारी या नात्याने होती. येथे सरपंचा बरोबर संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांविरोधातही कारवाई करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)ध्वजारोहण झालेच नाहीतुमसर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलाच्या वसतीगृहात प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण झाले नाही. स्थानांतरीत झालेल्या पहिल्या वस्तीगृहात ध्वज व इतर साहित्य ठेवलेल्या खोलीस नगरपरिषद प्रशासनाने सील केले होते. नविन इमारतीत वसतीगृह स्थानांतरित झाले. नविन ध्वज व साहित्य पुरवठा करण्याचे पत्र जिल्हा स्तरावरील कार्यालयाला दिले होते. साहित्य उपलब्ध न झाल्याने ध्वजारोहण झाले नसल्याचे गृहपालांनी सांगितले.