शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

देव्हाडी उड्डाणपुलाला गेले तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 6:00 AM

तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर देव्हाडी येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. कामाबाबत संशय निर्माण होत आहे. पुलाचा पोचमार्गावर मध्यभागी लांब तडे गेले आहे. पुल दगडी असून अंडरपासजवळील दगडांनी जागा सोडली आहे. दगड तिरपे झाले आहे. पोचमार्गात दोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देदगड निसटले : निर्माणाधीन पुलाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देव्हाडी येथील निर्माणाधीन उड्डाणपुलाला तडे गेल्याने एकाच खळबळ उडाली. हलक्या पावसात पुलावर लहान खड्डे पडले असून पुलाच्या मध्यभागातून लांब तडे गेल्याचे दिसत आहे. यामुळे पुलाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर देव्हाडी येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. कामाबाबत संशय निर्माण होत आहे. पुलाचा पोचमार्गावर मध्यभागी लांब तडे गेले आहे. पुल दगडी असून अंडरपासजवळील दगडांनी जागा सोडली आहे. दगड तिरपे झाले आहे. पोचमार्गात दोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राख वाहून गेल्याने पूल पोकळ होण्याची भीती निर्माण झाली आहे. दगडही खाली ढासळण्याची शक्यता आहे. आता तर पुलाच्या स्लॅबला मोठा तडा गेल्याचे दिसत आहे. हा प्रकार गंभीर असताना कुणाचेही लक्ष नाही.शासन, प्रशासन गप्पजागतिक बँक प्रकल्पाच्या वतीने २४ कोटींचा हा उड्डाणपूल बांधला जात आहे. संबंधित विभागाचा प्रतिनिधी आठ ते दहा दिवसातून एकदा भेट देतो. अन्य दिवशी कंत्राटदाराचे कर्मचारी काम पाहतात. त्यामुळे येथील कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. निर्माणाधीन पुलाची ही अवस्था कशामुळे झाली हे कुणालाही सांगण्याची गरज नाही. याप्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी स्टेशनटोलीचे माजी सरपंच शाम नागापुरे, तुडकाचे माजी सरपंच सुदाम मानापुरे, खुशाल नागपुरे, संदिप बोंद्रे यांनी केली आहे.