शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

इंधन दरवाढीने ऑटोरिक्षा चालकांपुढे कुटुंबाचा गाडा ओढण्याचा गहन प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 05:00 IST

भंडारा रोड रेल्वे स्थानकावर शेकडो ऑटोरिक्षा प्रवाशांची प्रतीक्षा करीत उभे असतात. ११ महिन्यांपासून या रिक्षा बंद असल्यासारख्या आहेत. प्रवाशांच्या गर्दीने ओसंडून वाहणारी रिक्षा आता प्रवाशांसाठी वणवण फिरत आहे. वाहतूक व्यवस्था पूर्वपदाला येत असली तरी ऑटोरिक्षा चालकांची परिस्थिती सुधारताना दिसत नाही. संकटाच्या काळात रोजी पडत नसल्याने ऑटोरिक्षा व्यावसायिक संकटात सापडत आहेत.

ठळक मुद्देभंडारा रोड रेल्वेस्थानकापुढील वास्तव : पर्यायी व्यवसाय झाला कठीण

तथागत मेश्रामलोकमत न्यूज नेटवर्कवरठी : प्रवासी वाहतूक करणारी वाहने प्रवाशांसाठी जीवनवाहिनीचे काम करतात. कार्यालयीन प्रवास असो की विद्यार्थी वाहतूक सुरक्षेची खात्री आणि सुनियोजित ठिकाणी पोहचण्याचे उत्तम साधन अशी ओळख आहे. मात्र गतवर्षी कोरोना महासंकट आणि आता इंधन दरवाढीने ऑटोरिक्षा व्यावसायिक संकटात सापडले आहेत. कुटुंबाचा गाडा कसा हाकावा, असा गहन प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे. अनेकांना आता मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे.भंडारा रोड रेल्वे स्थानकावर शेकडो ऑटोरिक्षा प्रवाशांची प्रतीक्षा करीत उभे असतात. ११ महिन्यांपासून या रिक्षा बंद असल्यासारख्या आहेत. प्रवाशांच्या गर्दीने ओसंडून वाहणारी रिक्षा आता प्रवाशांसाठी वणवण फिरत आहे. वाहतूक व्यवस्था पूर्वपदाला येत असली तरी ऑटोरिक्षा चालकांची परिस्थिती सुधारताना दिसत नाही. संकटाच्या काळात रोजी पडत नसल्याने ऑटोरिक्षा व्यावसायिक संकटात सापडत आहेत. भंडारा रोड रेल्वे स्थानकावर २५० परवानाधारक आणि ग्रामीण भागात ५० ऑटोरिक्षा धावतात. कोरोनाच्या काळापासून हा व्यवसाय कुलूपबंद झाला आहे. अशीच अवस्था तालुका आणि जिल्हास्तरावरील ऑटोरिक्षा चालकांची आहे. दिवसभर एका ठिकाणी उभे राहूनही प्रवासी मिळत नाही. त्यामुळे अनेक ऑटोरिक्षाचालक बसस्थानकाभोवती घिरट्या घालतात. प्रवाशांच्या विणवण्या करतात. परंतु दाद मिळत नाही. आता काही जण रोजंदारीवर तर काही जण बांधकाम कामावर जाताना दिसत आहेत.

दरवाढीचा व्यवसायावर परिणाम झाला काय कोरोनाने प्रवाशांची वानवा आणि पेट्रोलची दरवाढ घाम फोडणारी आहे. रिकामा ऑटोरिक्षा घेऊन भंडारा रोड रेल्वे स्थानकाबाहेर तासनतास  बसूनही प्रवासी मिळत नाहीत. आता अनेक जण भाजीपाला व इतर पर्यायी व्यवसायात जात आहेत. परंतु त्यात जम बसणे सर्वांनाच शक्य नाही.

पैसे उरत नसल्याने करावे लागते इतर काम भंडारा रोड रेल्वेस्थानकावर भंडारासाठी जवळपास २५० परवानाधारक ऑटोरिक्षा आहेत. कोरोना काळापासून व्यवसाय बंद आहेत. प्रवासी रेल्वेगाड्या रोडावल्याने भाडे मिळत नाही. अनेक जण रोजमजुरी करीत आहेत. तर काही जण बांधकाम मजूर म्हणून कामावर जात असल्याचे चित्र आहे.

कोरोना महासंकटातून आता सावरायला लागलो तर पेट्रोलचे दर १०० रुपयावर पोहचले. त्यामुळे भाडे परवडत नाही. सुरुवातीला भाजीपाला विक्रीचा व्यवसाय थाटला पण आता तोही बंद आहे. प्रवासी मिळत नाहीत. आता काय करावे, असा प्रश्न आहे.-गुरुदेव बोंद्रे, ऑटोचालक

ऑटोरिक्षा व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. संपूर्ण आयुष्य ऑटोरिक्षा चालविण्यात गेले. दुसऱ्या व्यवसायात मन रमत नाही. परंतु आता प्रवाशांची संख्या रोडावल्याने दिवसभर प्रवासी मिळत नाहीत. शासनाने रिक्षाचा टॅक्स माफ करून आर्थिक मदत द्यावी.-संजय हटवार, ऑटोचालक

ऑटोरिक्षा व्यवसायावर २० वर्षांपासून कुटुंब चालवत होतो. अचानक व्यवसायावर गंडांतर आले. पेट्रोलचे भाव आकाशाला भिडत आहेत. त्यामुळे प्रवासी भाडे परवडत नाही. परंतु पर्याय नसल्याने काहीच करता येत नाही. सकाळपासून रस्त्यावर उभे राहूनही प्रवासी शोधून सापडत नाही. सापडले तर भाव परवडत नाही.-सरोज रामटेके, ऑटोचालक

 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल