शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
6
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
7
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
8
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
9
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
10
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
11
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
12
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
13
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
14
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
15
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
16
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
17
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
18
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
19
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...

रुग्ण कमी झाले म्हणजे कोरोना गेला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 5:00 AM

रुग्ण कमी झाल्याने ब्रेक द चेनअंतर्गत निर्बंध शिथिल झाले. बाजारपेठ रात्री १० वाजेपर्यंत उघडी असते. आता सध्या सण-उत्सवाचा काळ सुरू झाला आहे. बाजारात नागरिक गर्दी करीत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हे सर्व धोकादायक आहे. तिसरी लाट आल्यास परिणाम सर्वांनाच भोगावे लागणार आहे. दुसऱ्या लाटेचा अनुभव असतानाही नियमांना पायदळी तुडविले जात आहे.

ज्ञानेश्वर मुंदेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली. राज्यात कोरोनामुक्त होणारा पहिला जिल्हा ठरला. मात्र, रुग्ण कमी झाले म्हणजे कोरोना गेला असे नाही. महानगरात रुग्ण वाढत आहेत. तिसऱ्या लाटेचे ते संकेत आहेत. सण-उत्सव साजरे करताना नियम पायदळी तुडविणे धोक्याचे ठरू शकते. कोरोना नियमांच्या पालनासोबतच लसीकरण आवश्यक आहे, असा सल्ला जिल्हा प्रशासन वारंवार देत आहे. त्यानंतरही नागरिक बेफिकीरीने वागत आहेत. ही सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे.रुग्ण कमी झाल्याने ब्रेक द चेनअंतर्गत निर्बंध शिथिल झाले. बाजारपेठ रात्री १० वाजेपर्यंत उघडी असते. आता सध्या सण-उत्सवाचा काळ सुरू झाला आहे. बाजारात नागरिक गर्दी करीत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हे सर्व धोकादायक आहे. तिसरी लाट आल्यास परिणाम सर्वांनाच भोगावे लागणार आहे. दुसऱ्या लाटेचा अनुभव असतानाही नियमांना पायदळी तुडविले जात आहे.दीड लाख लसीकरणाचे उद्दिष्टजिल्ह्यात लसीकरण मोहीम वेगात सुरू आहे. आगामी १५ दिवसात दीड लाख नागरिकांचे लसीकरण करण्याची मोहीम जिल्हा आरोग्य यंत्रणेने हाती घेतली आहे. जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.मुलांसाठी आयसीयूलहान मुलांना कोरोना झाला तर त्यांच्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात सुसज्ज अशा आयसीयू कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. लहान मुलांवर उपचारासाठी नागपूर येथे नुकतेच प्रशिक्षण पार पडले. आशावर्करांनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे. ग्रामीण आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.

कोणताही ताप अंगावर काढू नका- सध्या कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी बाहेरगावावरून येणाऱ्यांनी आपली आरटीपीसीआर चाचणी करणे गरजेचे आहे. कोणताही ताप अंगावर काढू नये. डेंग्यू मलेरिया आणि कोरोना यांची लक्षणे सारखीच आहेत. डेंग्यू मलेरियाची चाचणी निगेटिव्ह आल्यास कोरोनाची चाचणी करावी. ताप अंगावर काढू नये. सर्दी, खोकला असेल तर सेल्फ क्वारंटाइन व्हावे, असा सल्ला आरोग्य यंत्रणा देत आहे.

लसीकरण हाच एकमेव उपाय- जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण सुरू आहे. पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या सहा लाख ६२ हजार आहे, तर दुसरा डोस एक लाख ८६ हजार व्यक्तींनी घेतला आहे. आजही अनेकजण लसीकरणासाठी पुढे येत नाही. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना कोरोना झाला तरी त्यांना रुग्णालयात भरती व्हायची वेळ येणार नाही आणि मृत्यू तर निश्चितच होणार नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात सर्वत्र लसीकरण सुविधा उपलब्ध आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह ठिकठिकाणी दररोज लसीकरण होत आहे.

आरोग्यविषयक उपक्रमांना प्राधान्य द्या

सध्या सर्व ठिकाणी उत्सवाचे पर्व आहे. येणाऱ्या काळात गणेशोत्सव, गौरी, दुर्गोत्सव, दसरा, दिवाळी हे सण येत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हे सर्व सण-उत्सव साधेपणाने, नियमांचे पालन करून साजरे होणे आवश्यक आहे. केरळमध्ये ओणमनंतर मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली. आपल्या जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी असली तरी धोका टळला नाही. उत्सवात गर्दीच्या कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रमांना प्राधान्य द्यावे. कोरोना, मलेरिया, डेंग्यू व इतर आजार व त्याचे प्रतिबंधात्मक उपाय करण्यासोबतच लसीकरणाबाबत जनजागृती करावी.संदीप कदम, जिल्हाधिकारी, भंडारा

कोरोना गेला नाही, हे लक्षात असू द्या. रुग्ण कमी झाले म्हणजे कोरोना संपला असे नाही. नागपुरात कोरोना रुग्ण काही दिवसांपासून वाढत आहेत. त्यानंतर आपल्या जिल्ह्यातही रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग आवश्यक आहे. -डाॅ.रियाज फारुकी,  जिल्हा शल्यचिकित्सक, भंडारा

मास्कचा वापर, लसीकरण, फिजिकल डिस्टन्सिंग आणि गर्दीत जाणे टाळावे ही चतु:सुत्री अमलात आणली तर कोरोनाचा धोका नाही. ताप, खोकला, डायरिया आदी लक्षणे दिसत असल्यास तात्काळ तपासणी करावी. ताप अंगावर काढु नये.डाॅ.प्रशांत उईके,   जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या