शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
3
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
4
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
5
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
6
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
7
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
8
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
9
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
10
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
11
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
12
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
13
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
14
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
15
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
16
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
17
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
18
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
19
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
20
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!

निसर्गाच्या वक्रदृष्टीने उन्हाळी धान उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:34 IST

भंडारा जिल्ह्याची ओळख ही उद्योगविरहित, सिंचनाच्या सोयींचा अभाव, रबी मालासाठी उपलब्ध नसलेल्या बाजारपेठेचा जिल्हा म्हणून आहे. मुख्य पीक खरीप ...

भंडारा जिल्ह्याची ओळख ही उद्योगविरहित, सिंचनाच्या सोयींचा अभाव, रबी मालासाठी उपलब्ध नसलेल्या बाजारपेठेचा जिल्हा म्हणून आहे. मुख्य पीक खरीप असल्याने जवळपास ९० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेती म्हणजेच सर्वस्व असल्याने येथील शेतकऱ्यांचे संसार हे येणाऱ्या पिकावरच अवलंबून असते. अशातही अत्यल्प व कवडीमोल भाव यामुळे सर्व चिंतेत आहेत. शासनस्तरावरून विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नाहक कागदपत्रे व कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत असल्याने सामान्यांचा जीव मेटाकुटीस आलेला आहे.

जिल्ह्यात असलेल्या खरेदी केंद्रावर धानाची आवक वाढलेली असली तरीही शेतकऱ्यांना चुकाऱ्यांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी पडक्या दरात धानाची विक्री करीत आहे. अडत्याकडे धानांच्या भावांचे बोर्डसुध्दा नाहीत.

त्यामुळे अडत्याने जो भाव सांगितला, त्याच भावात आपला माल विकल्याशिवाय गत्यंतर नसल्याने शेतकरी वर्ग अधिकच खचत असून जीवनाचा अंत स्वीकारण्यास धजावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. म्हणूनच पाच एकर शेती असलेला शेतकरी हा मजुरापेक्षाही दु:खी आहे. तेव्हा 'बळी' न पडता बळीचे राज्य येण्यासाठी शासनाने कंबर कसून अभय देण्याची गरज आहे.

यावर्षी ऐन धान पीक कापणी योग्य असताना पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणात घट आली आहे. एकरी कमी उत्पादन होत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. धान खरेदी केंद्रावर धानाची मोजणी विलंबाने होत आहे. आपला नंबर कधी येणार अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.